Agriculture news in Marathi Four times heavy rain in Atpadi taluka | Agrowon

आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

बॅंका, विकास सेवा सोसायट्या आणि वेळप्रसंगी खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन मोठ्या कष्टाने हजारो शेतकऱ्यांनी डाळिंब, द्राक्ष, झेंडू, ढोबळी मिरचीसह विविध भाजीपाला आणि फळ पिकांनी माळराने फुलवली. एक नव्हे, दोन नव्हे तब्बल चार वेळा अतिवृष्टी आणि विक्रमी हजार मिलिमीटर पावसाच्या तडाख्याने सारं होत्याचं नव्हतं झालं.

आटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या आणि वेळप्रसंगी खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन मोठ्या कष्टाने हजारो शेतकऱ्यांनी डाळिंब, द्राक्ष, झेंडू, ढोबळी मिरचीसह विविध भाजीपाला आणि फळ पिकांनी माळराने फुलवली. एक नव्हे, दोन नव्हे तब्बल चार वेळा अतिवृष्टी आणि विक्रमी हजार मिलिमीटर पावसाच्या तडाख्याने सारं होत्याचं नव्हतं झालं. तालुक्‍यात शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. शेती, शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे.

दुष्काळी म्हणून आटपाडीची ओळख आहे. कमी पाऊस नेहमीचाच. शेतकरी कमी पाण्यात येणारी पिके घेतात. डाळिंब हुकमी पीक. अलीकडे टेंभूचे पाणी आल्याने द्राक्ष, ढोबळी मिरची, शेवगा, मका, झेंडू आणि इतर भाजीपाल्याचे क्षेत्र चांगलेच वाढले.मृगात जून, जुलैमध्ये बहुतांश डाळिंबाच्या भागाचा हंगाम धरला. सर्व प्रकारच्या भाजीपाला, झेंडूची लागवडही केली होती. कमी पाण्यात येणारी पिके असताना जून पासून पावसाची संततधार आहे. एक नव्हे दोन नव्हे तब्बल चार ते पाच वेळा अतिवृष्टी झाली. तीन वेळात १०० मिलिमीटर वर एकाच वेळी पाऊस कोसळला. साऱ्या शेतांना तळ्याचे स्वरूप आले. पिके पाण्याखाली गेली.

डाळिंब बागांत गुडघाभर पाणी साचून राहिले. मोठ्या प्रमाणात फळकुजवा, फळगळ सुरू झाली. बघता बघता झड रिकामी झाली. उशिराने झालेल्या बागांची फूलगळ झाली. डाळिंबासह सर्व शेतांत पाझर लागलेत. डाळिंबात मर रोग वाढला आहे. द्राक्षाची ५०० हेक्‍टरवर क्षेत्र आहे. हंगाम धरण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. अतिवृष्टीत सारे काही वाहून गेले. द्राक्ष, डाळिंब बागांना घातलेली खते वाहून गेली. ढोबळी मिरची, शेवगा, भुईमूग, बाजरी, झेंडू हिप क्रिकेटर रानात सोडून आणि कुजत चाललीय. शेतकऱ्यांनी केलेला लाखोंचा खर्च वाया गेला.

अनेक ठिकाणी ओढा पात्राचे पाणी शेतातून गेले आहे. अडीचशे हेक्‍टर क्षेत्र पाण्याने वाहून गेलेय. ओढ्यात असलेल्या पाईप, मोटारी, वायर आणि आणि कडब्याच्या गंजी वाहून गेल्या. सागर तलाव, साठवण तलाव, नालाबांध, बंधारे, शेकडो विहिरी गाळाने बुजल्या आहेत.

रब्बी हंगामातील पेरण्या धोक्‍यात
सततच्या पावसामुळे शेतात आणि पाणी साचला आहे. अनेक शेतांना पाझर लागले आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या धोक्‍यात आले आहेत. पाणी आटून आणि पाझर थांबून तनक केव्हा काढायची आणि पेरण्या कधी होणार?, सारे अंधारात आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...