Four times for the summer You will get water from Isapur
Four times for the summer You will get water from Isapur

उन्हाळ्यासाठी चारवेळा मिळणार ‘इसापूर’चे पाणी

नांदेड : जिल्ह्याला वरदान ठरलेला ऊर्ध्व पैनगंगा इसापूर प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे उन्हाळी हंगामासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना चार पाणी पाळ्या मिळणार आहेत.

नांदेड : जिल्ह्याला वरदान ठरलेला ऊर्ध्व पैनगंगा इसापूर प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे उन्हाळी हंगामासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना चार पाणी पाळ्या मिळणार आहेत. 

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे उन्हाळी हंगाम सन २०२०-२१ मधील पाणीपाळ्यांचे नियोजन जलसंपदा विभागाने जाहीर केले आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली २३ जानेवारी रोजी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळीचे नियोजन केले होते. यानुसार वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. 

इसापूर उजवा व डाव्या कालव्यातून पहिली पाणीपाळी एक मार्च २०२१ रोजी, दुसरी २७ मार्चला, तिसरी २३ एप्रिलला, तर चौथी पाणीपाळी १९ मे रोजी सोडण्यात येईल. या आर्वतनासाठी अटी व शर्तीची पूर्तता आवश्यक आहे. आवर्तन प्रारंभ होण्याच्या व समाप्त होण्याच्या दिनांकामध्ये क्षेत्रीय परिस्थितीनुसार थोडा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

रब्बी हंगामी, दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात व विहित दिनांकापूर्वी संबंधित शाखा कार्यालयात दाखल करावेत. पिकांचे मागणी क्षेत्र वीस आरच्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील.  पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही.

काही अपरिहार्य कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. लाभधारकांनी दिवस  व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे.

अन्यथा, दंडात्मक कारवाई... 

‘‘शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. उडाप्याच्या अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहील. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे, गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल’’, असे कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com