agriculture news in marathi Four times for the summer You will get water from Isapur | Agrowon

उन्हाळ्यासाठी चारवेळा मिळणार ‘इसापूर’चे पाणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 मार्च 2021

नांदेड : जिल्ह्याला वरदान ठरलेला ऊर्ध्व पैनगंगा इसापूर प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे उन्हाळी हंगामासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना चार पाणी पाळ्या मिळणार आहेत. 

नांदेड : जिल्ह्याला वरदान ठरलेला ऊर्ध्व पैनगंगा इसापूर प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे उन्हाळी हंगामासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना चार पाणी पाळ्या मिळणार आहेत. 

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे उन्हाळी हंगाम सन २०२०-२१ मधील पाणीपाळ्यांचे नियोजन जलसंपदा विभागाने जाहीर केले आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली २३ जानेवारी रोजी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळीचे नियोजन केले होते. यानुसार वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. 

इसापूर उजवा व डाव्या कालव्यातून पहिली पाणीपाळी एक मार्च २०२१ रोजी, दुसरी २७ मार्चला, तिसरी २३ एप्रिलला, तर चौथी पाणीपाळी १९ मे रोजी सोडण्यात येईल. या आर्वतनासाठी अटी व शर्तीची पूर्तता आवश्यक आहे. आवर्तन प्रारंभ होण्याच्या व समाप्त होण्याच्या दिनांकामध्ये क्षेत्रीय परिस्थितीनुसार थोडा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

रब्बी हंगामी, दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात व विहित दिनांकापूर्वी संबंधित शाखा कार्यालयात दाखल करावेत. पिकांचे मागणी क्षेत्र वीस आरच्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. 
पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही.

काही अपरिहार्य कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. लाभधारकांनी दिवस 
व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे.

अन्यथा, दंडात्मक कारवाई... 

‘‘शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. उडाप्याच्या अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहील. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे, गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल’’, असे कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांनी स्पष्ट केले.


इतर बातम्या
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
दिग्गज प्रस्थापितांमध्ये रंगणार ‘गोकुळ’...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
‘शेती’वरही निर्बंध; दुकाने फक्त 'या'...पुणे : कोरोना विषाणूच्या जीवघेण्या साथीला पायबंद...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
मोसंबीच्या वाण निवडीसाठी संशोधन...औरंगाबाद : राज्यातील शेतकऱ्यांना सध्या अस्तित्वात...
जगाची ‘फळांची करंडी’ होण्याची...पुणे ः ‘घरी ज्याच्या फळांची करंडी तोची असे खरा...
कोकणात बांधावरच्या पिकांची होणार...पुणे : कोकणातील दुर्लक्षित परंतु येत्या काळात...
विदर्भात आजपासून पावसाची शक्यतापुणे : विदर्भाच्या अनेक भागांत अंशतः ढगाळ...
राज्यात अद्याप ३६ कारखान्यांचा हंगाम...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात हुपरी (ता. हातकणंगले...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...