Agriculture news in marathi For four years in Bhokarkheda Farmers waiting for electricity connection | Agrowon

भोकरखेडात चार वर्षांपासून शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 एप्रिल 2021

 सुमारे चार वर्षांपूर्वी शेतकऱ्याने कोटेशन भरले. विजेसाठी खांबही उभे राहले. मात्र, अर्धवट काम झाल्याने वीज कंपनीकडून या शेतकऱ्याला अद्यापही वीज पुरवठा मिळू शकलेला नसल्याचे प्रकरण समोर आले आहे.

वाशीम : शेतात वीज जोडणी घेऊन सिंचन करता येईल. आपले उत्पन्न वाढविता येईल, या उद्देशाने सुमारे चार वर्षांपूर्वी शेतकऱ्याने कोटेशन भरले. विजेसाठी खांबही उभे राहले. मात्र, अर्धवट काम झाल्याने वीज कंपनीकडून या शेतकऱ्याला अद्यापही वीज पुरवठा मिळू शकलेला नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. संबंधित कंत्राटदार शेतकऱ्याकडून पैसे घेऊन पसार झाला असून, आता अधिकारीही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने शेतकऱ्याला मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

या बाबत सविस्तर वृत्त असे की, रिसोड तालुक्यातील भोकरखेडा येथील शेतकरी शेषराव कुंडलिक भोकरे यांनी २८ फेब्रुवारी २०१७ रोजी शेतात वीज पुरवठा घेण्यासाठी कोटेशन भरले. त्यानंतर काही दिवसांनी कंत्राटदारामार्फत शेतामध्ये खांब उभे केले. त्यावेळी संबंधित कंत्राटदाराची याच भागात इतरही कामे सुरू होती. आपले काम लवकर व्हावे म्हणून शेतकरी सातत्याने कंत्राटदाराच्या संपर्कात होता. पैसे देऊनही कंत्राटदाराने मात्र तारा न ओढताच काढता पाय घेतला.

तेंव्हापासून भोकरे हे येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. २०१७ पासून त्यांच्या शेतात केवळ खांब उभे आहेत. शेतात पाणी असूनही वीज नसल्यामुळे शेतकरी मात्र सिंचनापासून वंचित राहला आहे. यामुळे चार वर्षांपासून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे. 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...