महाराष्ट्रातील १४ जिल्हे ‘रेड’ झोनमध्ये

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील रेड, ऑरेंज व ग्रीन झोन शहरांची यादी शुक्रवारी (ता.१) जाहीर केली. त्यात राज्यातील १४ जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील १४ जिल्हे ‘रेड’ झोनमध्ये
महाराष्ट्रातील १४ जिल्हे ‘रेड’ झोनमध्ये

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील रेड, ऑरेंज व ग्रीन झोन शहरांची यादी शुक्रवारी (ता.१) जाहीर केली. त्यात राज्यातील १४ जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुंबईसह मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव हे जिल्हे रेडझोनमध्ये आहेत. तर आँरेज झोनमध्ये राज्यातील १६ जिल्हे असून कोरोनामुक्त म्हणजेच ग्रीन झोनमध्ये ६ जिल्हे आहेत.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार देशात १३० रेड झोन, २८४ ऑरेंज झोन; तर ३१९ ग्रीन झोन आहेत. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक कोरोना प्रभावित राज्य गुजरातमध्ये ९ रेड झोन आहेत. राजधानी दिल्लीचाही रेड झोनमध्ये समावेश आहे. दिल्लीत कोरोना प्रादुर्भावाचा वेग चिंताजनक असून गुरुवारी येथे नवे ७६ रुग्ण आढळले; तर तीन जणांचा मृत्यू झाला. येथील एकूण रुग्णांची संख्या ३५१५; तर मृतांचा आकडा ५९वर पोहोचल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. झारंखडमध्ये केवळ राज्याची राजधानी रांचीच रेड झोनमध्ये आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी दिल्ली सरकारने सर्व नागरिकांची चाचणी व हॉटस्पॉट भागातील नागरिकांची १४ दिवसांतून तीनदा चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रेडझोनमध्ये कोरोनाला अटकाव करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार "क्‍लस्टर कंटेनमेंट' कृतियोजना राबविली जात आहे. त्यानुसार बाधितांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेऊन त्यांची चाचणी केली जाते. रेडझोनमधील कोरोनाचा संसर्ग बाहेर पसरू नये, त्याला तेथेच थांबवले जावे, यासाठी विशेष उपाययोजना या योजनेअंतर्गत राबवल्या जात आहेत, असेही मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले.

राज्यातील ऑरेंज झोनमधील जिल्हे रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदूरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड

कोरोनामुक्त अर्थात ग्रीन झोनमधील जिल्हे उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com