चौदाव्या विधानसभेत अपक्ष, बंडखोरांचा जोर
चौदाव्या विधानसभेत अपक्ष, बंडखोरांचा जोर

चौदाव्या विधानसभेत अपक्ष, बंडखोरांचा जोर

मुंबई ः विधानसभेच्या २८८ मतदारसंघातील निकाल हाती आले आहेत. भाजपने शतक पार केले आहे. १०७ जागांवर भाजपचे उमेदवार जिंकून आले आहेत. त्याचप्रमाणे भाजपचा मित्रपक्ष शिवेसनेलाही ५६ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने ५४ तर काँग्रेस आणि मित्रपक्षाने ५२ जागांवर विजय मिळवत महाआघाडीची शंभरी ओलांडली आहे. यंदाच्या निवडणुकीत बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांचा बोलबाला राहिला. तब्बल १३ अपक्ष आमदारांनी विधिमंडळ गाठले आहे. 

त्याचबरोबर हितेंद्र ठाकूर यांच्या ‘बहुजन विकास आघाडी’ला ३ जागा मिळाल्या आहेत. प्रहार जनशक्ती, एमआयएम, समाजवादी पक्ष यांना प्रत्येकी दोन जागांवर यश मिळाले आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला जेमतेम भोपळा फोडता आला. मनसेची एक जागा निवडून आली आहे. माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, शेकाप, रासप, स्वाभिमानी या सर्व पक्षांना एक-एक जागा जिंकता आली.

उत्तर महाराष्ट्रात शिवसेना-भाजपला संमिश्र यश मिळाले आहे. नाशिक शहरातील तीनही जागा भाजपने जिंकल्या आहेत. जामनेरमधून जलसंपदामंत्री गिरीश महाजन तर शिर्डीतून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मालेगाव बाह्यमधून राज्यमंत्री दादा भुसे विजयी झाले आहेत. तर विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्यासह माजी मंत्री बबनराव पाचपुते पराभूत झाले आहेत. १९९५ पासून विधानसभेवर सलग निवडून येणारे शिवाजीराव कर्डिले यांना पराभव पत्कारावा लागला आहे.

विदर्भात युतीला फटका विदर्भात भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी करण्यात काँग्रेसला यश आले आहे. विद्यमान कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, राज्यमंत्री परिणय फुके, माजी मंत्री राजकुमार बडोले पराभूत झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे नाना पटोले विजयी झाले आहेत. 

मराठवाड्यात राष्ट्रवादीने युतीला रोखले बीडमध्ये ग्रमविकासमंत्री पंकजा मुंडे, फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. बीड, परभणीत राष्ट्रवादी तर नांदेडमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ जावळे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे निवडून आले आहेत. तर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना जालन्यात तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांना तुळजापूरमध्ये पराभव पत्कारावा लागला. 

पक्षनिहाय बलाबल
पक्ष विजयी जागा
भाजप १०५ 
शिवसेना ५६ 
राष्ट्रवादी ५४
काँग्रेस ४४
अपक्ष १३
जनसुराज्य शक्ती
क्रांतिकारी शेतकरी पार्टी
मनसे
शेकाप
प्रहार जनशक्ती
राष्ट्रीय समाज पक्ष
समाजवादी पार्टी
स्वाभिमानी पक्ष
कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)
एमआयएम
बहुजन विकास आघाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com