Agriculture news in marathi; Fourth time to prepare onion seedlings | Agrowon

चौथ्यांदा कांदा रोपे तयार करण्याची वेळ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

नाशिक  : जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर होतात. यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची रोपे तयार करण्यासाठी उळे रोपे तयार करण्यासाठी टाकली. मात्र, सततचा पाऊस चालू राहिल्याने मोठ्या प्रमाणावर उतरलेली रोपे सडली आहेत; तर काही रोपे विरळ झाल्याने कांदा रोपांचा मोठा तुटवडा कांदा उत्पादकांना भासत आहे. त्यामुळे लागवडीसाठी अपेक्षित रोपे उपलब्ध होणार नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना चौथ्यांदा रोपे टाकण्याची वेळ आली आहे. 

नाशिक  : जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर होतात. यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची रोपे तयार करण्यासाठी उळे रोपे तयार करण्यासाठी टाकली. मात्र, सततचा पाऊस चालू राहिल्याने मोठ्या प्रमाणावर उतरलेली रोपे सडली आहेत; तर काही रोपे विरळ झाल्याने कांदा रोपांचा मोठा तुटवडा कांदा उत्पादकांना भासत आहे. त्यामुळे लागवडीसाठी अपेक्षित रोपे उपलब्ध होणार नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना चौथ्यांदा रोपे टाकण्याची वेळ आली आहे. 

सिन्नर, येवला, चांदवड, निफाड, कळवण, देवळा व सटाणा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक कांदा उत्पादक डेंगळे लागवड करून कांद्याचे बियाणे तयार करतात. मात्र, शेतकऱ्यांनी तयार करून टाकलेली रोपे खराब झाली आहेत. कांदा बियाणे टंचाई निर्माण झाली असून ८ ते ९ हजार रुपये पायलीप्रमाणे म्हणजेच जवळजवळ २ हजार रुपये किलोप्रमाणे बियाणे खरेदी करावे लागत आहे. त्यातच थोडे फार प्रमाणात उपलब्ध असलेल्या कांदा बियाणांचा दर वधारला आहे. अनेक कांदा उत्पादकांचे घरातील बियाणे संपले आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांच्या बियाणांचे दर वाढले आहेत. उन्हाळ कांदा लागवड हंगाम एक महिना उशिरा जानेवारीअखेर पर्यंत कांदा लागवडी चालणार आहेत. निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात धुईचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रोपे मोठ्या प्रमाणावर खराब होत आहेत. अवकाळी पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

नुकसानीची सद्यःस्थिती 

  •  रोपांचे जिल्ह्यात ७० ते ८० टक्के नुकसान 
  •  घरगुती तयार केलेले कांदा बियाणे संपुष्टात
  •  नवीन बियाणे खरेदी करण्याची वेळ
  •  बियाण्याचा प्रतिकिलो १९०० ते २००० दर
  •  अपेक्षित उन्हाळ कांदा लागवडीची गती संथ

     

रोपे होती ती पावसाच्या तडाख्यात सापडून खराब झाली. आता १९०० किलोप्रमाणे महागाचे बियाणे घेऊन पुन्हा रोपे तयार करावे लागत आहे. कांद्याचा उत्पादनखर्च ५० टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे चालू वर्षीचा उन्हाळ कांदा हंगाम अडचणीचा ठरत आहे. 
- ज्ञानेश्वर कांगुणे, 
कांदा उत्पादक, दरसवाडी, ता. चांदवड

उन्हाळ कांदा रोपे ८० ते 
९० टक्के रोप पावसाने खराब झाले आहे. शेतकऱ्यांनी घरगुती तयार केलेले बियाणे संपले; परंतु आता विकत बियाणे घेऊन रोपे तयार करावी लागणार 
आहेत. 
- योगेश अडसरे, 
करंजी खुर्द, ता. निफाड 

रोपे खराब झाल्याने लागवडी लांबणीवर गेल्या आहेत. मी ६ एकर क्षेत्रासाठी रोप तयार केले. मात्र, आता दोन एकरसुद्धा लागवड होणार नाही.
- शिवाजी ढाकणे, 
कांदा उत्पादक, चास, ता. सिन्नर
 


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...