agriculture news in marathi fourty lakh bales demand lacks after lockdowon | Agrowon

देशात ४० लाख कापूस गाठींच्या मागणीत घट

चंद्रकांत जाधव
गुरुवार, 30 एप्रिल 2020

लॉकडाऊनमुळे देशभरातील वस्त्रोद्योगाची चाके थांबली आहेत. परिणामी देशात उत्पादित ४० ते ४२ लाख गाठींची मागणी कमी झाली आहे.

जळगाव ः लॉकडाऊनमुळे देशभरातील वस्त्रोद्योगाची चाके थांबली आहेत. परिणामी देशात उत्पादित ४० ते ४२ लाख गाठींची मागणी कमी झाली आहे. पुढे लॉकडाऊन दूर झाले तरी देशांतर्गत कापूस बाजारात मोठा दबाव वाढणार असून, खासगी बाजारातील कापूस दरांची स्थिती सुधारण्याची कुठलीही शक्‍यता नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

देशात सुमारे १२०० सूतगिरण्या तर सुमारे ९५० जिनींग प्रेसिंग कारखाने आहेत. लुधियाना, कानपूर, भिवंडी, इचलकरंजी, गुंटूर आदी भागात उद्योजकांनी टेक्‍सटाईल पार्क उभारले आहेत. सूतगिरण्यांना देशात दर महिन्याला २२ ते २५ लाख गाठींची गरज असते. परंतु लॉकडाऊनमुळे हा उद्योग मागील ४० ते ४२ दिवसांपासून पूर्णतः बंद आहे. सहा गाठींपासून (एक गाठ १७० किलो रुई) एक मेट्रिक टन कापडाचे उत्पादन घेतले जाते. कापूस जगत किंवा वस्त्रोद्योगाचे वर्ष १ ऑक्‍टोबर ते ३० सप्टेंबर असे असते. 

अर्थातच देशात ऑक्‍टोबर ते मार्चच्या मध्यापर्यंत सुमारे १३० लाख गाठींवर प्रक्रिया झाली. त्यापासून कापडाची निर्मिती झाली. तामिळनाडू, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरातमधील कापडाची मोठ्या प्रमाणात युरोपात निर्यात केली जाते. तसेच सुताची निर्यात चीन, बांदलादेश, व्हीएतनाम येथे केली जाते. देशात पाच हजार कोटी किलोग्रॅम सुताचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. कापड मिला किंवा यंत्रमाग, हातमाग उद्योग ठप्प असल्याने सुताला उठाव नाही. 

सुताचे उत्पादन झाल्यानंतर एक ते दीड महिन्यात त्याचा कापड निर्मितीसाठी उपयोग करणे आवश्‍यक असते. अन्यथा त्याचा दर्जा घसरतो. निर्यातीसंबंधीच्या मापदंडात हे सूत येत नाही. मग ते पडून राहते. परिणामी सूतगिरण्या ठप्प आहेत. राज्यात सुमारे ७५ सूतगिरण्या आहेत. तर मालेगाव, भिवंडी, सोलापूर, इचलकरंजी येथे यंत्रमाग, हातमाग उद्योग आहे. हा उद्योग ठप्प आहे. ज्या मिला, गिरण्यांनी परदेशात कापड, सुताची मध्यंतरी विक्री केली. त्यांचे चुकारे त्यांना प्राप्त झालेले नाही. हा उद्योग अडचणीत आलेला आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, दिल्लीत मोठा कापड उद्योग

देशातील वस्त्रोद्योगाचा आलेख

  • एकूण सूतगिरण्या : १२०० 
  • एकट्या तामिळनाडूतील सूतगिरण्या : ५००
  • एका सूतगिरणीची दररोजची गरज : ५५ ते ७० गाठी

चीन, युरोपात कापड, सुताला मागणी असते. तेथून रिकामे कंटेनर (मालवाहू जहाज) येत नसल्याने निर्यातच होत नसल्याची स्थिती आहे. सूतगिरण्या, कापड मिल्स ठप्प असून, कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च करणेही शक्‍य नाही. 
— दीपक पाटील, अध्यक्ष, 
लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, उंटावद-होळ, जि.नंदुरबार.

मार्चनंतर कापड, सुताची निर्यात थांबली आहे. हा उद्योग किमान ४० दिवसांपासून बंद आहे. ४० ते ४२ लाख गाठींची मागणी घटली आहे. किंवा त्यांची उचलच झालेली नाही. देशातील वस्त्रोद्योग पुढे सुरू झाला तरी कापूस बाजारात फारशी सुधारणा होईल, असे मला वाटत नाही. आता फक्त सरकीलाच मागणी आहे. 
- महेश पाटोदिया, जिनींग, स्पीनींग मिलचालक, मालेगाव, जि. नाशिक.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...