चाळीस माकडांना महापुरातून कोथळीकरांनी दिले जीवदान

चाळीस माकडांना महापुरातून कोथळीकरांनी दिले जीवदान
चाळीस माकडांना महापुरातून कोथळीकरांनी दिले जीवदान

कोल्हापूर :चारी बाजूंनी पाणी आल्याने अस्वस्थपणे फिरणाऱ्या चाळीस माकडांना कोथळी (ता.शिरोळ) येथे बुधवारी सकाळी ग्रामस्थांनी (ता.७) जीवदान दिले.

कृष्णा काठावर वसलेल्या कोथळी(ता.शिरोळ) येथील गावाला या पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. २००५ साला इतके पाणी आले आहे. गावाच्या उत्तरेला असलेल्या मशिदीच्या परिसरात मंगळवारी संध्याकाळी माकडाने मुक्काम ठोकला होता. झाडावर आणि सकाळी बुधवारी पाणी मशिदीचे रस्ता ओलांडून तीस ते चाळीस फुटावर अंतरावर आले होते चारी बाजूने पाण्याने वेढा दिल्याने आपल्याला सोबत पिलांना घेऊन ही ४० माकडे अस्वस्थ होऊन इकडून तिकडे भिंतीच्या कंपाउंडवर फिरत होती. त्यांची ही अस्वस्थता पाणी बघण्याची निमित्ताने आलेल्या गावातील तरुणांना लक्षात आली. गेले काही दिवस माणसांसह पाळीव प्राण्यांना बाहेर काढण्यासाठी माणुसकी जपत असलेल्या कोथळी करांची या जनावरांसाठीही माणुसकी जागी झाली.

गावात उच्छाद मांडणाऱ्या या माकडांच्या जिवासाठी ही त्यांनी मशिदीच्या कंपाउंड लगत रस्त्याच्या पलीकडील विठ्ठल मंदिराच्या कंपाउंडला शिडी आणि काठ्या टाकून पूल तयार केला आणि काही क्षणात आपल्या पिलांना हृदयाला कवटाळून ही माकडे महापुरातून मार्ग काढत गावात परतले. इतर वेळी गावात उच्छाद मांडणाऱ्या माकडांचा बंदोबस्त करा, असे म्हणणारे ग्रामस्थ अशा या महापुरात माकडांचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. माणुसकी आणि मुक्या प्राण्याबद्दल असलेला जिव्हाळा अशा बाबतीत बरेच काही सांगून जाणारा ठरला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com