agriculture news in marathi fourty three thousand hectare rabbi sowing in Maan Taluka | Agrowon

माणमध्ये रब्बीची ४३ हजार हेक्‍टरवर पेरणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

माण तालुक्‍यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने यावर्षी तालुक्‍यात गतवर्षीपेक्षा जास्त ४२ हजार ७८० हेक्‍टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.
 

कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने यावर्षी तालुक्‍यात गतवर्षीपेक्षा जास्त ४२ हजार ७८० हेक्‍टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.

गतवर्षी तालुक्‍यात जिल्ह्यात सर्वांत जास्त ३० हजार ५६७ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झालेली होती. चांगला पाऊस आणि पोषक वातावरणामुळे रब्बीची पिके चांगली येतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांनी रब्बीसाठी ज्वारी, गहू, हरभरा, मका, कांदा या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. 

खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे बाजरी, मूग पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. पाऊसकाळ भरपूर असल्याने पिके चांगली येण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. तालुक्‍यात रब्बीच्या पेरणीला वेग आला आहे.

सुरवातीस कोरडवाहू तसेच वापसा आलेल्या क्षेत्रावर कांदा, मका आणि ज्वारीची पेरणी उरकली आहे. मळ्याच्या (चिबडाच्या) शेतामध्ये जसजसा वापसा येईल, तसे गहू, हरभरा पेरणीला गती आली आहे. त्यामुळे अजून पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. उन्हाळ्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये म्हणून उशिरा वापसा येणाऱ्या शेतात चाऱ्याची पिके घेतली जातील. 

यंदा भरपूर पाऊस झाला असल्याने मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने पारंपरिक पिकांसह नवीन पिकांची निवड करावी. त्याबरोबर अंतरपिकांची लागवड करावी. यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होईल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

उपलब्ध पाणी साठ्यामुळे शेतकरी फळबागा, चारापिके तसेच बागायती पिके घेण्याकडे वळत आहे. सर्वत्र पाणीसाठा असल्यामुळे यावर्षी उत्पादनात भरघोस वाढ होईल, अशी शक्‍यता आहे. गव्हाच्या वाढीसाठी थंड, कोरडे व स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त हवामान आवश्‍यक असते. सध्याचा विचार करता वापशाअभावी गहू पिकाच्या पेरणीस उशीर झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीस प्राधान्य दिले आहे.


इतर ताज्या घडामोडी
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरुरत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र...नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत...
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव...जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’...