agriculture news in Marathi FPO can auction from procurement centers Maharashtra | Agrowon

शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश 

वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रावरून कंपन्यांना ऑनलाइन व्यवहार करता येणार आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे बाजार समित्यांमध्ये गर्दी कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. 
 

नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ‘ई-नाम’मध्ये दोन नविन फिचर्स् चा समावेश केला आहे. यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रावरून कंपन्यांना ऑनलाइन व्यवहार करता येणार आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे बाजार समित्यांमध्ये गर्दी कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

‘‘देशात सध्या कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. त्यातच शेतकरी बाजार समित्यांमध्ये गर्दी करत असल्याने धोका वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समित्यांपासून दूर ठेवून त्यांचा शेतमाल विक्री करता यावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ‘ई-नाम’ची व्याप्ती वाढवत दोन नविन फिचर्स् चा समावेश केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बाजारात यावे लागणार नाही,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

केंद्राने ‘ई-नाम’मध्ये आणलेल्या फिचरमध्ये वेअरहाऊसमधून व्यापार करण्याचे मॉड्यूल आहे. ‘ई-नाम’च्या सॉफ्टवेअरमध्ये वेअरहाऊसमधून ‘एनडब्ल्यूआर’ (इलेक्ट्रॉनिक नेगोशिएबल वेअरहाऊस रिसिट) प्रमाणे व्यवहार करण्याची सुविधा देण्यात आली आहे. दुसऱ्या फिचरमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना व्यवहार करण्याची सुविधा देण्यात आली आहे. शेतकरी कंपन्या बाजार समित्यांमध्ये शेतमाल न आणता त्यांच्या खरेदी केंद्रांवरूनच व्यवहार करू शकतात. 

ट्रॅकिंगचीही सुविधा 
‘ई-नाम’ प्लॅटफॉर्मवर मंडी किंवा बाजार समित्यांअंतर्गत आणि राज्याराज्यांमध्ये व्यापारासाठी लॉजिस्टीकचे नवे मॉडेल वापरण्यात येणार आहे. लॉजिस्टीकच्या पातळीवर वाहतूक करताना खरेदीदारांना त्यांच्या मालाच्या वाहतुकीचे ट्रॅकिंग करता येणार आहे. याचा फायदा व्यवहारात पारदर्शकता येण्यासाठी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...