agriculture news in marathi, fraud case against three seed companies, Maharashtra | Agrowon

तीन बियाणे कंपन्यांवर फसवणूकप्रकरणी गुन्हा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

गुजरात, आंध्रप्रदेश राज्यातून बोगस बियाण्यांचा पुरवठा कंपन्यांनी केला. अशा बोगस बियाण्यांच्या विक्रीला कृषी विभागाने राज्यात परवानगी दिली. या साऱ्यामुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला आहे. त्याची भरपाई कंपन्यांकडून व्हावी. कंपन्यांसह दोषी कृषी अधिकाऱ्यांविरोधात देखील कारवाई व्हावी. 
- देवेंद्र भुयार, विदर्भ अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
 

अमरावती ः लागवड केलेल्या कपाशीच्या तीन कंपन्यांच्या वाणांवर १०० टक्‍के गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या शेतकऱ्याच्या तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी संबंधित कंपन्यांविरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुका कृषी कार्यालयात केलेल्या डेरा आंदोलनानंतर रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वरुड तालुक्‍यातील वाडेगाव येथील शेतकरी संजय महादेव साबळे यांनी ९ जून २०१८ रोजी शेतीधन कृषी सेवा केंद्रातून राशी ६५९, बायर बायो सायन्स कंपनीचे सुपर्ब खरेदी केले. गौरी कृषी सेवा केंद्रातून बायरचे सुपर्ब तसेच अंकुर कंपनीचे ३०२८ हे वाण खरेदी केले होते. ०.४० तसेच ०.७३ हेक्‍टर क्षेत्रावर याची लागवड करण्यात आली. 

दरम्यान बियाणे सदोष असल्याने त्यावर काही महिन्यांतच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. फूल आणि पात्यावर बोंड अळी दिसल्याची तक्रार शेतकऱ्याने पंचायत समितीकडे केली. त्याची दखल घेत वरुड तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी व शेतकरी संजय साबळे यांनी पाहणी केली. प्राथमिक पाहणी अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे देण्यात आला. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीने देखील संबंधित कंपन्यांच्या वाणावर १०० टक्‍के बोंड अळी झाल्याचे निरीक्षण नोंदविले. २४ ऑगस्ट रोजी हा अहवाल सादर करण्यात आला. 

स्वाभिमानीचे आंदोलन आणि गुन्हा
याप्रकरणी अंकुर, बायर आणि राशी या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल व्हावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात वरुड तालुका कृषी कार्यालयात डेरा आंदोलन करण्यात आले. कृषिमंत्री चंद्रकांत पाटील तसेच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी या आंदोलनासंदर्भाने संपर्क साधण्यात आले. त्यामुळे कृषी विभागात एकच धावपळ झाली. या घडामोडीनंतर रात्री उशिरा अंकुर सीडस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, बायर बायोसायन्स प्रा. लि. माधापूर हैदराबाद, राशी सिडस प्रा. लि. अत्तुर, तामिळनाडू या तीन कंपन्यांविरोधात फसवणूक तसेच बियाणे कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


इतर अॅग्रो विशेष
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
रेशीम शेतीतून टाकळीने बांधले प्रगतीचे...यवतमाळ जिल्हयात रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थिक...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....