agriculture news in marathi fraud case Misleaded by agriculture commissionarte office : Information Commission | Agrowon

कृषिसेवक भरतीतील गैरव्यवहारावर पांघरूण; माहिती आयोगाचे गंभीर ताशेरे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

राज्यात २०१६ मध्ये झालेल्या कृषिसेवक भरती प्रकरणात कृषी आयुक्तालयाने गैरव्यवहारावर पांघरूण घातले होते. तसेच, माहिती देण्यास देखील टाळाटाळ केली, असे ताशेरे राज्याच्या माहिती आयोगाने एका निकालपत्रात ओढले आहेत. 

पुणे : राज्यात २०१६ मध्ये झालेल्या कृषिसेवक भरती प्रकरणात कृषी आयुक्तालयाने गैरव्यवहारावर पांघरूण घातले होते. तसेच, माहिती देण्यास देखील टाळाटाळ केली, असे ताशेरे राज्याच्या माहिती आयोगाने एका निकालपत्रात ओढले आहेत. 

राज्य परीक्षा परिषदेमार्फत कृषी आयुक्तालयाने ७३० जागांसाठी परीक्षा घेतली होती. या परीक्षेतील गैरप्रकाराचा सूत्रधार आयुक्तालयाच्या आस्थापना विभागातच होता. ‘आस्थापना’तील तत्कालीन प्रशासनाधिकारी डी.आर. मखरे यांनीही माहिती दडविली होती. मात्र, युवक कॉंग्रेसचे नेते डॉ. विक्रम गायकवाड यांनी हे प्रकरण माहिती आयोगाकडे नेले. डॉ. गायकवाड विरूध्द कृषी आयुक्तालय या वादाकडे कृषी खात्याचे लक्ष लागू होते. 

‘‘आम्ही मागितलेली माहिती कृषी खात्याकडून विधानसभेत दिली जात होती. मात्र, कायदा असूनही आम्हाला मात्र माहिती दिली गेली नाही, असा युक्तिवाद आम्ही केला. माहिती दडवून ठेवण्याचा सामूहिक प्रयत्न आयुक्तालयाने केला,’’ असे डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले. विधिमंडळाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.  

तसेच गुन्हे अन्वेषण मार्फत चौकशीची शिफारस कृषी सचिवाने केली होती. मात्र, कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनी मोठी खेळी केली. घोटाळा केल्याचा संशय असलेल्या अधिकाऱ्यांचीच एक चौकशी समिती नेमली. समितीने ठरल्याप्रमाणे घोटाळेबहाद्दरांना ‘क्लीन चीट’ही दिली.

दरम्यान, या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी पुढे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात गेले. न्यायाधिकरणाने आधीच्या चौकशी समितीच्या आधारे घोटाळा झाला नसल्याचे सांगत उत्तीर्ण परीक्षार्थी यांना कामावर रुजू करून घेण्याचे आदेश दिले. मात्र, डॉ. गायकवाड यांनी माहिती आयोगासमोर घोटाळ्याशी संबंधित अनेक बाबी निदर्शनास आणून दिल्या. 

माहिती आयुक्त संभाजी सरकुंडे यांनी निकालात म्हटले आहे की, ‘‘माहिती देण्याऐवजी सर्व गैरप्रकारावर पांघरून घातले गेले. न्यायाधिकरणाला वेळेत माहिती दिली गेली असती तर प्रकरण वेगळे झाले असते. अपिलार्थीस खूप त्रास झाला असून जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. प्रथम अपिलाचा निकाल देखील चुकीचा दिला. यातून अपिलार्थीस मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास झाला आहे. त्यामुळे २५ हजार रुपये नुकसानभरपाईपोटी द्यावे.” 

कृषी आयुक्तालयाने अनेक महिने या निकालाकडेही दुर्लक्षच केले. अखेर ५ ऑगस्टला पुन्हा जागे झालेल्या आयुक्तालयाने भरपाई अदा करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

घोटाळा दडपण्यासाठी केंद्रेकरांची बदली
संशयास्पद अधिकाऱ्यांचीच चौकशी समिती नेमणे, मॅटच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद न मागणे, तत्कालीन कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांची तडकाफडकी बदली करणे या सर्व घटना म्हणजे कृषिसेवक भरतीचा महाघोटाळा दडपण्याचाच एक भाग होता, असा आरोप डॉ. गायकवाड यांनी केला आहे.


इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...