डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक 

डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या व्यवसायात पैसा गुंतविण्यास भाग पाडले आणि ४ कोटी ११ लाख ४८ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी सहा जणांच्या टोळीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक  Fraud of dal trader by Rs 4 crore
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक  Fraud of dal trader by Rs 4 crore

नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या व्यवसायात पैसा गुंतविण्यास भाग पाडले आणि ४ कोटी ११ लाख ४८ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी सहा जणांच्या टोळीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अमर खनवानी (तेलीपुरा पेवठा, कळमना), श्यामसुंदर सोमय्या, पंकज सोमय्या, तुलसीदास सोमय्या, उमाकांत ऊर्फ उमेश सोमय्या (सर्व रा. छाप्रूनगर) आणि दत्ता शिंदे (सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. गांधीबाग येथे राहणारे दिलीप शांतिलाल जैन (वय ६२) डाळ, अन्नधान्य, तेल, बियाण्याचे विक्रेते आहेत. त्यांची कळमना येथे सुप्रिम पल्स मिलिंग इंडस्ट्रीज नावाने डाळमिल असून, डिप्टी सिग्नल येथे कार्यालय आहे. सोमय्या कुटुंबीयांची नवदुर्गा इंडस्ट्रीज नावाने डाळमिल आहे. २०१९मध्ये जैन यांच्या ओळखीचे श्यामसुंदर सोमय्या इतर आरोपींना घेऊन जैन यांच्या कार्यालयात आले. सर्व आरोपींनी जैन यांना सांगितले की, सोलापूर येथील गोकूळ शुगर इंडस्ट्रीज लि. कंपनी सुपर स्टॉकिस्ट आहे. तुम्ही साखरेच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळेल. सोलापूर येथील गोकूळ शुगर येथे कमी भावात साखर मिळते. तुम्हाला साखरेची खरेदी करून आगाऊ पैसे द्यावे लागतील. साखरेची पोती आणणे आणि विकणे आम्ही करू. आम्ही सांगू त्यानुसार तुम्हाला बिल बनवून द्यावे लागेल आणि त्याचे पैसे १० ते २० दिवसांत मिळतील, असे आमिष दाखविले. त्यामुळे साखरेच्या व्यावसायात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. 

सुरुवातील दिले नियमित पैसे  डिसेंबर २०१९मध्ये अमर खनवानीने जैन यांच्या कंपनीच्या माध्यमातून साखरेचा व्यावसाय सुरू केला. जैन यांचा विश्वास बसावा म्हणून अमरने सुरुवातीला ५० ते १०० टन साखर विकून त्याचे पैसे दिले. त्यामुळे जैन यांचा अमरवर विश्वास बसला. जानेवारी २०२०मध्ये अमरने जैन यांना दिनशॉ डेअरी फूड्स कंपनी आणि इतर कंपन्यांकडून साखरेची मागणी आली आहे. त्यांना ५०० टन साखरेची आवश्यकता आहे. प्रतिटन एक हजारांने साखर मिळणार असून, त्यात फायदा भरपूर आहे, असे सांगितले. झुलेलाल इंटरप्रायजेसकडून ३०० आणि ए. ए. ट्रेडर्सकडून २०० टन साखर बुक केली. ती साखर दिनशॉ कंपनीला देऊ. त्यामुळे जैन १ कोटी ६४ लाख ६३ हजार रुपये झुलेलाल आणि ए. ए. ट्रेडर्सच्या खात्यात भरले. 

चौकशी केल्यावर फुटले बिंग  जैन यांनी दिनशॉ कंपनीकडून बिल मागितले, असता त्यासाठी दिनशॉसोबत व्हेंडर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे अमरने क्रिष्णा इंटरप्रायजेसच्या नावाने बिल तयार केले. १५ दिवस होऊनही दिनशॉकडून बिल न आल्याने जैन यांना अमरवर संशय आला. अशाप्रकारे अमर व इतर आरोपींनी जैन यांच्याकडून वेळोवेळी कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com