Agriculture news in marathi Fraud of dal trader by Rs 4 crore | Page 2 ||| Agrowon

डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या व्यवसायात पैसा गुंतविण्यास भाग पाडले आणि ४ कोटी ११ लाख ४८ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी सहा जणांच्या टोळीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या व्यवसायात पैसा गुंतविण्यास भाग पाडले आणि ४ कोटी ११ लाख ४८ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी सहा जणांच्या टोळीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अमर खनवानी (तेलीपुरा पेवठा, कळमना), श्यामसुंदर सोमय्या, पंकज सोमय्या, तुलसीदास सोमय्या, उमाकांत ऊर्फ उमेश सोमय्या (सर्व रा. छाप्रूनगर) आणि दत्ता शिंदे (सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. गांधीबाग येथे राहणारे दिलीप शांतिलाल जैन (वय ६२) डाळ, अन्नधान्य, तेल, बियाण्याचे विक्रेते आहेत. त्यांची कळमना येथे सुप्रिम पल्स मिलिंग इंडस्ट्रीज नावाने डाळमिल असून, डिप्टी सिग्नल येथे कार्यालय आहे.

सोमय्या कुटुंबीयांची नवदुर्गा इंडस्ट्रीज नावाने डाळमिल आहे. २०१९मध्ये जैन यांच्या ओळखीचे श्यामसुंदर सोमय्या इतर आरोपींना घेऊन जैन यांच्या कार्यालयात आले. सर्व आरोपींनी जैन यांना सांगितले की, सोलापूर येथील गोकूळ शुगर इंडस्ट्रीज लि. कंपनी सुपर स्टॉकिस्ट आहे. तुम्ही साखरेच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळेल. सोलापूर येथील गोकूळ शुगर येथे कमी भावात साखर मिळते. तुम्हाला साखरेची खरेदी करून आगाऊ पैसे द्यावे लागतील. साखरेची पोती आणणे आणि विकणे आम्ही करू. आम्ही सांगू त्यानुसार तुम्हाला बिल बनवून द्यावे लागेल आणि त्याचे पैसे १० ते २० दिवसांत मिळतील, असे आमिष दाखविले. त्यामुळे साखरेच्या व्यावसायात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. 

सुरुवातील दिले नियमित पैसे 
डिसेंबर २०१९मध्ये अमर खनवानीने जैन यांच्या कंपनीच्या माध्यमातून साखरेचा व्यावसाय सुरू केला. जैन यांचा विश्वास बसावा म्हणून अमरने सुरुवातीला ५० ते १०० टन साखर विकून त्याचे पैसे दिले. त्यामुळे जैन यांचा अमरवर विश्वास बसला. जानेवारी २०२०मध्ये अमरने जैन यांना दिनशॉ डेअरी फूड्स कंपनी आणि इतर कंपन्यांकडून साखरेची मागणी आली आहे. त्यांना ५०० टन साखरेची आवश्यकता आहे. प्रतिटन एक हजारांने साखर मिळणार असून, त्यात फायदा भरपूर आहे, असे सांगितले. झुलेलाल इंटरप्रायजेसकडून ३०० आणि ए. ए. ट्रेडर्सकडून २०० टन साखर बुक केली. ती साखर दिनशॉ कंपनीला देऊ. त्यामुळे जैन १ कोटी ६४ लाख ६३ हजार रुपये झुलेलाल आणि ए. ए. ट्रेडर्सच्या खात्यात भरले. 

चौकशी केल्यावर फुटले बिंग 
जैन यांनी दिनशॉ कंपनीकडून बिल मागितले, असता त्यासाठी दिनशॉसोबत व्हेंडर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे अमरने क्रिष्णा इंटरप्रायजेसच्या नावाने बिल तयार केले. १५ दिवस होऊनही दिनशॉकडून बिल न आल्याने जैन यांना अमरवर संशय आला. अशाप्रकारे अमर व इतर आरोपींनी जैन यांच्याकडून वेळोवेळी कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. 


इतर बातम्या
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
कृषी उत्पन्नवाढीसाठी मागेल  त्या...सातारा : कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत...
मांजरा नदीला पूर, पाणी पात्राबाहेर निलंगा, जि. लातूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या...
परभणी जिल्ह्यातील  दोन मंडलांत...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
ग्रामीण भागाची वीजतोडणी मोहीम...अकोला : अतिवृष्टी सुरू असताना ग्रामीण भागातील...
बोधेगाव परिसराला तिसऱ्यांदा ...नगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात शनिवारी...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी  कोल्हापुरात...चंदगड, जि. कोल्हापूर : कृषी मालावर आधारित...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
नगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून  किसान...नगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर...