agriculture news in Marathi, fraud with grapes producers, Maharashtra | Agrowon

द्राक्ष उत्पादकांची पुन्हा फसवणूक

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

नाशिक : स्थानिक निर्यातदाराने नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची १ कोटी ९० लाख रुपये फसवणुकीचे प्रकरण ताजे असताना ओझर येथील गोपाळ धामट या व्यापाऱ्याने द्राक्ष उत्पादकांना अधिक भावाचे अमिष दाखवून दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. 

नाशिक : स्थानिक निर्यातदाराने नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची १ कोटी ९० लाख रुपये फसवणुकीचे प्रकरण ताजे असताना ओझर येथील गोपाळ धामट या व्यापाऱ्याने द्राक्ष उत्पादकांना अधिक भावाचे अमिष दाखवून दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी, की गोपाळ धामट हा ओझर येथील रहिवासी असून तो द्राक्ष व्यापारी आहे. त्याने सिद्ध पिंपरी, जानोरी यांसह निफाड तालुक्यातील ओझर, कोकणगाव, ओझर, कसबे सुकेणे, दात्याने, दीक्षी या गावांतील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. धामट यांनी या वर्षी सुरवातीला ओझर, पिंपळगाव, सय्यद पिप्री, आडगाव या शिवारातील शेतकऱ्यांकडून द्राक्ष विकत घेतली होती.

रोख रक्कम अदा करत द्राक्ष उत्पादकांचा विश्वास संपादन केला. जास्त भाव देतो असे सांगितले. नंतर व्यवहार करताना धनादेश देत धामट यांनी शेतकऱ्यांच्या बांगामधील द्राक्ष खरेदी केले. स्थानिक व्यापारी असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र द्राक्ष उत्पादकांना दिलेल्या रकमेचे धनादेश न वटल्याने शेतकऱ्यांनी पैशांसाठी धामट यांच्याकडे वेळोवेळी संपर्क साधला. मार्च अखेर असल्याने पेमेंट वेळेवर मिळत नसल्याचे करण देत धामट यांनी काही दिवस वेळ मारून नेली. त्यानंतर २३ मार्चपासून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांच्या कुटुंबीयांशी थेट विचारल्यानंतर त्यांच्या पत्नी व भावाने वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे दिले. असे या निवेदनात म्हटले आहे.

मोबाईल बंद करत धामट पसार झाला असे समजल्यानंतर संतप्त द्राक्ष उत्पादकांनी ओझर पोलिस ठाणे गाठत तक्रार केली. मात्र पोलिसांनी व्यापाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला नव्हता. व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घ्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि आमदार योगेश घोलप यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक आरती सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शेतकऱ्यांची मागणी न्यायिक असल्याचे मान्य करत सदर व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सिंग यांनी दिले. 

या वेळी जिल्हा परिषद सदस्य व द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक यतीन कदम, शेतकरी संघटनेचे अर्जुनतात्या बोराडे, सेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल ढिकले, सोमनाथ ढिकले, नामदेव ढिकले, बाळासाहेब राजोळे, सुधाकर ढिकले आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
नाशिक जिल्ह्यातील चालू द्राक्ष हंगामात व्यापाऱ्यांकडून फसवणुकीचे हे चौथे प्रकरण समोर आले आहे. शेतकरी आर्थिक फसवणूक झाल्यानंतर स्थानिक पोलिसात तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी जातात. मात्र स्थानिक पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, तसेच गुन्हा दाखल करून घेतले जात नसल्याने शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागायचा हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.


इतर अॅग्रो विशेष
दक्षिण कर्नाटक, तामिळनाडूत मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज (ता....
कोकणात पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रात आलेल्या ‘निसर्ग’...
रविवारपर्यंत मॉन्सूनची आणखी चाल शक्य पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरूवारी...
हमीभाव मिळवून देण्यात केंद्र सरकार...पुणे: केंद्र सरकार गाजावाजा करून हमीभाव जाहीर करत...
शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बियाणे अनुदान...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बियाणे...
साखर कारखान्यांनी लॉकडाउनमध्ये जमा केली...पुणे: लॉकडाउनमधील विविध अडचणींना तोंड देत...
माझा शेतकरी, माझा अभिमान ! ७ ते १३ जून...पुणे : कोरोनाच्या कठिणकाळात जनता घरबंद असताना...
कृषी उन्नती योजनेत ६६ टक्के कपातपुणे: कृषी उन्नती योजना राबविण्यासाठी केंद्र...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
दर्जेदार हळद पावडरीचा शिनगारे यांचा...परभणी जिल्ह्यातील वालूर सारख्या ग्रामीण भागात...
शेतकरी संघटना शुक्रवारी करणार ...नागपूर ः एचटीबिटीला मान्यता मिळावी या मागणीसाठी...
विधानपरिषदेच्या ८ सदस्यांची मुदत समाप्तमुंबई: विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त ८...
चक्रीवादळाच्या तडाख्यात मधूमका भुईसपाटनाशिक: नाशिक, सिन्नर व इगतपुरी तालुक्यांमध्ये १...
सातत्य, चिकाटी, प्रयत्नांतून...कोणताही व्यवसाय यशस्वी करायचा तर सातत्य आणि...
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...