शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन व्यापाऱ्याचा पोबारा

गिरणारे येथील एका व्यापाऱ्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास ७० ते ८० लाखांना गंडा घातल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे.
tomato_1.jpg
tomato_1.jpg

गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका व्यापाऱ्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास ७० ते ८० लाखांना गंडा घातल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील गिरणारे येथील टोमॅटो बाजारपेठ प्रसिद्ध आहे. पंचक्रोशीतील ४० ते ५० गावातील टोमॅटो विकण्यासाठी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात येत असतात. महिरावणी, दुडगाव, गणेशगाव, पिंपळगाव गरुडेश्‍वर, वासाळी, पिंपळगाव बहुला, दुगाव, गंगापूर, गिरणार परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांकरिता ही महत्त्वाची बाजारपेठ आहे.

रविवारी (ता. ७) शेतकऱ्यांनी नेहमी प्रमाणे माल आणल्यानंतर एका व्यापाऱ्याने जवळपास ७० -८० लाख रुपयांचे टोमॅटो खरेदी केले आणि माल पाठवून दिला. यानंतर पैसे न देताच संबंधित व्यापाऱ्याने पोबारा केल्याची घटना घडली. रविवारपासूनच या व्यापाऱ्याचा फोन बंद असल्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत चिंतेत आहे. फसवणूक झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी नजीकच्या तालुका पोलिस स्टेशनमध्ये सदर फसवणूक करणाऱ्या व्यापार विरोधात तक्रार दाखल केली आहे.

प्रतिक्रिया... सदर घटनेमुळे शेतकरी वर्गामध्ये अतिशय चिंतेचे वातावरण आहे. अशा घटना घडत राहिल्या तर शेतकरी आपला शेतीमाल विकणार तरी कोणाला? प्रशासनाने लवकरात लवकर या घटनेचा शोध घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी. - रवींद्र साळवे, शेतकरी, दुडगाव 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com