नाशिक बाजार समितीत आडत्याकडून फसवणूकीची शेतकऱ्याकडून तक्रार

नाशिक : शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीत फसवणूक होऊ नये, यासाठी बाजार समित्या कार्यरत असल्याचे नेहमी बोलले जाते. मात्र, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत फळांच्या विक्रीत आडते माल आणण्यापूर्वी अधिक दर सांगतात. विक्री दरम्यान अडवणूक करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात, असा आरोप नैताळे (ता. निफाड) येथील शेतकरी शिवनाथ घायाळ यांनी केला आहे.
Fraud traders in Nashik market committee, farmer blamed
Fraud traders in Nashik market committee, farmer blamed

नाशिक : शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीत फसवणूक होऊ नये, यासाठी बाजार समित्या कार्यरत असल्याचे नेहमी बोलले जाते. मात्र, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत फळांच्या विक्रीत आडते माल आणण्यापूर्वी अधिक दर सांगतात. विक्री दरम्यान अडवणूक करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात, असा आरोप नैताळे (ता. निफाड) येथील शेतकरी शिवनाथ घायाळ यांनी केला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील पेठ रोडवरील फळ विक्री आवारात आडत्याकडे चौकशी करून टरबूज विक्रीस आणले. त्यादरम्यान आडत्याने व्यवहारात एक रुपया कमिशनप्रमाणे 8 ते 10 प्रतिकिलो प्रमाणे दराची हमी दिली. प्रत्यक्षात खुल्या पद्धतीने लिलावाची पद्धत असताना आडत्याने रुमालाखाली खुणावून इच्छूक व्यापाऱ्यांशी व्यवहार केला. यावर दर अधिक सांगितल्याने व्यापाऱ्यांनी माल खरेदी केला नाही.यावर व्यापारी निघून गेले.याबाबत शेतकऱ्याने विचारणा केली असता माल परत घेऊन जाण्याची भाषा करत उडवाउडवीची उत्तरे दिली. 

याच दरम्यान दुसऱ्या व्यापाऱ्यांनी चार ते पाच रुपये किलोप्रमाणे मागणी केल्यानंतर खोटी सहानुभूती दाखवून आडत्याने व्यवहार घडवला. मालाचे वजन झाल्यावरही रोख पैसे न देता सहकारी बँकेचा धनादेश दिला. दोन तीन दिवसांनी येऊन चेक देऊन पैसे घेऊन जा नाही तर बँकेत भरा असे सांगितले. त्यामुळे पैसेही वेळेत मिळत नाही आणि फसवणूक करत कमी दरात माल घेऊन ज्यादा दरात विक्री होत असल्याचा आरोप आडत्यावर केला आहे. 

कमी भावात माल खरेदी करणारे व्यापारी आडत्याचे भागीदार?  फळ आवारात प्रामुख्याने परप्रांतीय व्यापारी आहेत. हे कमी भावात माल घेणारे व्यापारी म्हणजे संबंधित आडत्याचे भागीदार आहे. सुरुवातीला व्यवहार होऊ नये यासाठी आडते बाहेरील व्यापाऱ्यांना चढ्या दराने बोली लावतात. त्यामुळे व्यवहार होत नाही. हे इच्छूक व्यापारी गेल्यानंतर आडत्याचे भागीदार व्यापारी भासवून कमी भावात खरेदी करतात. अन् पुन्हा अधिक दराने व्यापाऱ्यांना माल देतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

बाजार समिती आवारात शेतकऱ्यांची लूट होते. जर बाजार समितीचे यंत्रणा येथे काम करते. तर शेतकऱ्यांची लूट कशी होते. लिलाव खुल्या पद्धतीने होऊनही अनेक फळ व्यापारी वांधा काढतात. आडत्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी.  - शिवनाथ घायाळ, शेतकरी, नैताळे, ता. निफाड 

या प्रकाराबाबत समजले. यावर शेतकऱ्याची बाजू ऐकून घेणार आहे, असे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही. या बाबत अडत्यांना नोटीस दिल्या आहेत. या प्रकाराबाबत चौकशी होणार असून तथ्य आढळल्यास अडत्याचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.  - संपतराव सकाळे, सभापती-कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com