सांगलीतील शेतकऱ्यांकडून फळांचे मोफत वाटप 

आटपाडी, जि. सांगली : शेतात चिकू आणि पेरूची बाग फळाने भरलेली असून बाहेर संचारबंदी आहे. त्यामुळे व्यापारी मिळेना. नाशवंत फळे किती दिवस ठेवायची. या विवंचनेतून तीन शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून पेरू आणि चिकूची गरजूंना मोफत वाटप करत आहेत. आत्तापर्यंत बारा टनांचे वाटप केले आहे. यातून फळे किंवा भाजीपाला शेतात सडण्यापेक्षा गरजवंतांना वाटप करण्याचा आदर्श त्यांनी इतरांसमोर निर्माण केला.
Free distribution of fruits by the farmers of Sangli

खानजोडेवाडीचे प्रगतशील शेतकरी पोपटराव सूर्यवंशी यांची डाळिंब आणि पेरूची बाग आहे. पेरूची तब्बल सहा हजार झाडे आहेत. तसेच तळेवाडीचे नामदेव सरगर आणि विजय पडळकर यांचीही चिकूची बाग आहे. या दोन्ही बागांतील पेरू आणि चिकू सध्या पक्व होऊन विक्री अवस्थेत आला आहे. कोणत्याही परिस्थितीत किमान १५ टन फळांची विक्री होण्याची गरज होती. मात्र, संचार बंदीमुळे व्यापारी फिरकेनात. शोधाशोध केली शेवटी ते शेतकरी हतबल झाले. 

शेतातील फळे डोळ्यांसमोर खराब होताना पाहण्याची वेळ आली. तेव्हा फळे वाया न घालवता गरजूंना मदत करावी, या सामाजिक हेतूने फळे घेऊन जाण्याचे आवाहन केले. सेनेचे नेते तानाजीराव पाटील यांनी स्वखर्चातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फळे तोडून आणून पुजारवाडी, आटपाडी, पळसखेल, तळेवाडी, करगणी गावात वाटप केले. तसेच दत्तात्रय पाटील यांनीही स्वखर्चातून फळे आणून लोकांना वाटप केले. 

गेली तीन दिवस फळांचे वाटप सुरू आहे. तीन दिवसांत तब्बल बारा टनांवर फळांचे वाटप केले. फळे किंवा भाजीपाला शेतात सडण्याऐवजी गरजूंना मदत रूपाने वाटप करण्याचा त्यांनी इतरांसमोर आदर्श यातून ठेवला आहे. तसेच शेतकरी पोपट सूर्यवंशी यांच्या खांनजोडवाडी गावातून सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निधी जमा केला तो ५१ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन मदत केली. 

६००० पेरूंची झाडे आहेत. यातून १०० टन माल निघेल. सध्या १५ टन माल विक्रीस आला. पण संचारबंदीमुळे व्यापारी मिळाले नाहीत. म्हणून फळे वाया न घालवता वाटप करण्याचा निर्णय घेतला.  - पोपट सूर्यवंशी, शेतकरी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com