Agriculture news in Marathi Free distribution of vegetable from the Atma farmers group | Agrowon

शेंडेवाडीतील आत्मा शेतकरी गटाकडून भाजीपाल्याचे मोफत वाटप

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

नगर ः  लॉकडाऊनमुळे संगमनेर तालुक्‍याच्या पठार भागातील शेंडेवाडी (ता. संगमनेर) या छोट्याशा गावातील शेतकरी गटाने अडीच टन भाजीपाल्याचे मोफत वाटप हातावर पोट असलेल्या मजुरांच्या वस्तीत केले. 
 

नगर ः  लॉकडाऊनमुळे संगमनेर तालुक्‍याच्या पठार भागातील शेंडेवाडी (ता. संगमनेर) या छोट्याशा गावातील शेतकरी गटाने अडीच टन भाजीपाल्याचे मोफत वाटप हातावर पोट असलेल्या मजुरांच्या वस्तीत केले. 

संगमनेर तालुक्‍यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील कंजारभाट, मातंग वस्ती, नाईक वस्ती तसेच ढोलवाडी परिसरात, मोलमजुरीवर चरितार्थ चालविणाऱ्या लोकांचा रहिवास आहे. गुजाळवाडी परिसरातील या मजुरांची स्थिती समजल्याने उत्पादित भाजीपाला या मजुरांना देण्याचा निर्णय शेंडेवाडी येथील श्री स्वामी समर्थ शेतकरी गटाने घेतला. 

सर्व सदस्यांकडून दीड हजार किलो कांदा, एक हजार किलो कोबी, कोथिंबिरीच्या एक हजार जुड्या जमा करण्यात आल्या. कृषी विभागाच्या ‘आत्मा’च्या सहकार्यातून प्रत्येक कुटुंबासाठी दोन किलो कांदे, एक किलो कोबी, गवार व दोन जुड्या कोथिंबीर, याप्रमाणे साडेचारशे कुटुंबांना भाजीपाल्याचे पॅकिंग करून वस्तीवर जाऊन वितरण केले. 

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल निकम, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, मंडळ कृषी अधिकारी लक्ष्मण भोकनळ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वैभव कानवडे, तलाठी पोमल तोरणे, बाळासाहेब वामन, नानाभाऊ उगले, राजू पचपिंड, भाऊ उगले उपस्थित होते.


इतर बातम्या
वनौषधी लागवडीसाठी निधी असूनही अनास्था पुणे: आयुर्वेदात प्रगत असल्याची जगभर शेखी...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करा...सोलापूर : ‘‘उजनीच्या पाण्याचा विषय हा...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...