कापशीत शेतकरी गटातर्फे भाजीपाल्याचे मोफत वितरण

अकोलाः कृषी तंत्रज्ञान व्यवथापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत श्री स्वयंभू गणेश शेतकरी उत्पादक गटाकडून कापशी रोड, कापशी (तलाव) येथे मोफत भाजीपाला वितरित करण्यात आला. गटातील सदस्यांनी शेतातील भाजीपाला ट्रॅक्टरमध्ये गोळा करून दिला.
Free distribution of vegetables by farmer group in Kapshi
Free distribution of vegetables by farmer group in Kapshi

अकोला ः कृषी तंत्रज्ञान व्यवथापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत श्री स्वयंभू गणेश शेतकरी उत्पादक गटाकडून कापशी रोड, कापशी (तलाव) येथे मोफत भाजीपाला वितरित करण्यात आला. गटातील सदस्यांनी शेतातील भाजीपाला ट्रॅक्टरमध्ये गोळा करून दिला. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या कालावधीत शेतकरी व शेतमजूरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे हातावर पोट असलेल्या गरीब व गरजूंना थोडा दिलासा मिळावा, यासाठी या भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले. 

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक मोहन वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी तथा प्रकल्प उपसंचालक अजय कुळकर्णी, तालुका कृषी अधिकारी फुलारी, मंडळ कृषी अधिकारी गजानन महल्ले, गटशेती तांत्रिक सहायक जितेश नालट व ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार यांच्या मार्गदर्शनाखाली हा गट स्थापन करण्यात आला आहे. 

संकटाच्या काळात गटाने सामाजिक बांधिलकी जोपासली. भाजीपाला घरोघरी जाऊन वाटप केला. कोरोना विषाणूबाबतही काळजी घेण्याच्या सूचना केल्या. यापुढेही संचारबंदीच्या काळात गटाकडून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गटाचे अध्यक्ष पुरूषोत्तम चतरकर, सचिव वसंतराव चतरकर, मनोहर येवले, विश्वनाथ खंडारे, गोपाल मानतकर, राम पाटील, विठ्ठल दिलीप पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com