दिल्लीत २०० युनिटपर्यंत मोफत वीज; केजरीवाल सरकारचा धमाका

केजरीवाल
केजरीवाल

नवी दिल्ली ः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेच्या दरात कपात करून दिल्लीकरांना खूश खबर दिली आहे. २०० युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार आहे. २०१ ते ४०० युनिटपर्यंतच विजेचे दर निम्म्याने कमी केले आहेत. यात दिल्ली सरकार ५० टक्के अंशदान देणार आहे. दिल्ली सरकारने काल विजेवरील निश्‍चित शुल्कातही घट करण्याचे जाहीर केले होते.  केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात दिल्ली हे सर्वांत स्वस्त वीज देणारे राज्य ठरले आहे, असे सांगत या निर्णयाचे वर्णन त्यांनी ऐतिहासिक असे केले. यामुळे "आम आदमी''ला (सामान्य नागरिक) दिलासा मिळेल, असे ते म्हणाले. ज्या ग्राहकांचा वीज वापर प्रत्येक महिन्याला २०० युनिटपर्यंत आहे त्यांना "फ्री लाइफलाइन इलेक्‍ट्रिसिटी'' या योजनेखाली वीजबिलापासून मुक्तता मिळणार आहे. "जर अतिमहत्त्वाच्या आणि मोठ्या राजकारण्यांना मोफत वीज मिळत असेल तर कोणी काहीच बोलत नाही. मग सामान्य माणसाला वंचित का ठेवायचे? हा निर्णय घेऊन मी चूक करीत आहे का, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.  "शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सेवांप्रमाणेच घरातील दिवे आणि पंखे सुरू करण्यासाठी वीज मिळणे आवश्‍यक आहे, असे ट्विट दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी "#PehleHalfAbMaaf'' या हॅशटॅगने पोस्ट केले आहे.  लाभार्थी दिल्लीकर... 

  • उन्हाळ्यात ज्यांचा वीज वापर २०० युनिटपेक्षा कमी आहे, अशा ३३ टक्के वीज ग्राहकांना 
  • हिवाळ्यात २०० युनिटपेक्षा कमी वीज वापर करणाऱ्या ७० टक्के ग्राहकांना
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com