नाशिक जिल्ह्यात वीस हजार विद्यार्थ्यांना मोफत पास

आठ तालुक्‍यांप्रमाणे १७ मंडळांतील विद्यार्थी मोफत प्रवास करू शकणार आहेत. दुष्काळी स्थितीत हा अनेक कुटुंबीयांना मोठा आधार आहे. -नरेंद्र दराडे, आमदार येथील पाच मंडळांतील विद्यार्थ्यांना मोफत पासवाटप सुरू केले आहे. सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. - समर्थ शेळके, आगारप्रमुख, येवला
वीस हजार विद्यार्थ्यांना मोफत पास
वीस हजार विद्यार्थ्यांना मोफत पास

येवला, जि. नाशिक : दुष्काळी मंडळातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचे आदेश अखेर दीड महिना आर्थिक भुर्दंड सहन केल्यानंतर निघाले आहेत. दुष्काळी तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबरपासूनच मोफत पास देणे सुरू आहे, तर मंडळातील विद्यार्थ्यांना मात्र कुठे मंगळवार (ता. १)पासून मोफत पासवाटप सुरू झाले आहे. उशिरा का होईना जिल्ह्यातील सुमारे २० हजारांवर विद्यार्थ्यांना या मोफत पासचा लाभ होणार आहे.

शासनाने सर्वप्रथम १५१ तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर केला. मात्र सॅटेलाइट सर्वेक्षणाने शासनाची फसवणूक केल्याने पुन्हा एकदा शासनाला २६८ महसुली मंडळांसाठी नवा निर्णय काढून दुष्काळ जाहीर करावा लागला होता. मात्र परिवहन महामंडळाने सुरवातीला १५१ तालुक्‍यांतीलच विद्यार्थ्यांनाच मोफत पास देण्याचे आदेश काढले. परिणामी २६८ महसूल मंडळे वाऱ्यावर राहिली होती. जिल्ह्यात येथील सर्वाधिक विद्यार्थी असल्याने आमदार नरेंद्र दराडे यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावतेंची भेट घेऊन निवेदन दिले, तर आमदार किशोर दराडे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मागणी केली होती. 

युवानेते संभाजी पवार यांनी येवल्यात आंदोलन करून थेट मंत्रालय व नाशिक कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. या लढ्याला यश आले असून, आता जिल्ह्यातील १७ महसूल मंडळांतील सुमारे २० हजार, तर येथील पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत पास मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या भागाला लाभ

जिल्ह्यात कळवण, नवी बेज, मोकभणगी, दिंडोरी तालुक्‍यातील दिंडोरी, मोहाडी, वरखेडा, निफाडसह रानवड, चांदोरी, देवगाव, सायखेडा, नांदूर व येवल्यातील नगरसूल, अंदरसूल, पाटोदा, सावरगाव व जळगाव नेऊर या १७ मंडळांत दुसऱ्या यादीत दुष्काळ जाहीर झाला आहे. येथे मोफत पासचा लाभ मिळेल.  शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे २६८ मंडळांसाठी आदेश निघत नसल्याने विद्यार्थ्यांना दीड महिना रोखीने पास काढावा लागला आहे. त्याबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com