मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पास

मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पास
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पास

मुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना बारावीपर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला.  आतापर्यंत ही सवलत दहावीपर्यंतच्या मुलींसाठी होती. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आता शिवशाही बससाठीही सवलत लागू करण्यात आली आहे. पत्रकारांनाही आता वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. याशिवाय इतर विविध समाजघटकांनाही एसटी बसमध्ये प्रवासासाठी सवलतींची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या वेळी केली. या विविध सवलतींचा लाभ राज्यातील सुमारे दोन कोटी १८ लाख लाभार्थींना होणार आहे. एसटी महामंडळामार्फत समाजातील विविध वंचित घटकांना प्रवास सवलत देऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो. यात प्रमुख्याने विद्यार्थी सवलत, ज्येष्ठ नागरिक सवलत, अंध-अपंगांना असलेली सवलत याचा राज्यातील लाखो घटकांना लाभ मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com