Agriculture news in marathi Free vegetable distribution of 'BTB' vegetable market in the Bhandara | Agrowon

भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या वतीने निशुल्क भाजीपाला

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या मोहिमेला सहकार्य देत ‘बीटीबी’ भाजीबाजाराच्या वतीने निशुल्क भाजीपाला वितरण करण्यात येत आहे. 

भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या मोहिमेला सहकार्य देत ‘बीटीबी’ भाजीबाजाराच्या वतीने निशुल्क भाजीपाला वितरण करण्यात येत आहे. 

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गरजू तसेच गरिबांचा रोजगार हिरावला गेल्याने त्यांना जीवनाश्‍यक वस्तूंची खरेदी करणेही शक्‍य होत नाही. त्यामध्ये भाजीपाल्याचाही समावेश आहे. अशावेळी गरीब, गरजूंना बीटीबीने मदतीचा हात देत निशुल्क भाजीपाला वितरणाचा उपक्रम राबविला आहे. 

भाजीबाजारात येणारा भाजीपाला एका वाहनात भरुन शहरातील विविध भागात मोफत वितरीत करण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरिबांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात गल्लोगल्ली भाजीपाला निशुल्क दिला जात आहे. सामाजिक भान ठेवून हा भाजीपाला मोफत वितरीत केला जात आहे. संचारबंदीच्या संपूर्ण कालावधीत हे कार्य केले जाईल, अशी माहिती देण्यात आली. 

सामाजिक भावनेतून भाजीपाला निशुल्क देण्याचा निर्णय घेण्यात आला. हातावर पोट असणाऱ्या अनेकांचा रोजगार संचारबंदीमुळे हिरावला गेला आहे. अशांना अल्पसा दिलासा मिळावा, याकरिता हे कार्य केले जात आहे. 
- बंडू बारापात्रे,
अध्यक्ष बीटीबी सब्जीमंडी, भंडारा


इतर बातम्या
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...