व्यापाऱ्याकडे अडकलेले कांद्याचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा

पैसे मिळविण्यासाठी अनेक वेळा तगादा लावला. मात्र समोरचा व्यापारी उडवाउडवीची उत्तरे देत असे. अलीकडे पोलिस कारवाईचा धाक दिल्यांनतर तो न जुमानता जिवे मारण्याची धमकी देत होता. मात्र सरकारच्या मध्यस्थीने अडकलेली रक्कम मिळण्यास हातभार लागला आहे. - अकिल शेख, आर. एल. ट्रेडिंग कंपनी, नामपूर, ता. सटाणा
कांद्याचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा
कांद्याचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा

नाशिक : उत्तर प्रदेश सरकारच्या कृषी व पणन विभागाच्या विशेष सचिव ममता यादव यांनी नामपूर बाजार समितीतील अकिल शेख प्रकरणात लक्ष घालून मे. नाज आलू कंपनीला त्यांचे अडकलेले कांद्याचे पैसे अदा करण्याचे लेखी पत्रात सूचित केले. त्यामुळे संबंधित ठोक व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे अडकलेले पैसे देण्याचे कबूल केले आहे. यामुळे पैसे मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

नामपूर बाजार समितीत अकिल शेख या अडतदाराने आर. एन. ट्रेडिंग कंपनीतर्फे कांदा खरेदी केला. तो चक्रपूर (कानपूर) येथील ठोक व्यापारी मे. नाज आलू कंपनीला पाठविला. २२ डिसेंबर २०१७ ते १६ मार्च २०१८ दरम्यान १,३८,८६,२५९ रुपयांचा व्यवहार नाज आलू कंपनीबरोबर झाला. त्याबदल्यात १,१२,३७,१६० रुपये मिळाले. मात्र व्यवहाराच्या पोटी २६,१९,०९९ रु. येणे बाकी ठेवले. या व्यापारात खरेदी केलेल्या कांद्याचे पेमेंट कानपूर येथील व्यापाऱ्याने न दिल्याने शेतकऱ्यांचे विक्री झालेल्या कांद्याचे पेमेंट अडकले होते.

आर. एन. ट्रेडिंग कंपनीचे मालक अकिल शेख यांनी वेळोवेळी पैसे मिळायची व्यापाऱ्याकडे मागणी केली. मात्र व्यापाऱ्याने आज देतो, उद्या देतो असे करत तब्बल एक वर्षभर पैसे देण्यास टाळाटाळ केली.

अलीकडे शेख यांनी पैशांसाठी संपर्क केल्यांनतर तो जिवे मारण्याची धमकी देत होता. याबाबत नामपूर बाजार समितीचे संचालक दीपक पगार, शरद सावंत, डी. डी. खैरनार यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेतली. त्यांच्या माध्यमातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून फसवणुकीच्या प्रकरणात लक्ष घालण्याचे कळविले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com