पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधा ः अजित पवार

पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंच व सुरक्षित जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या  घरांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधा ः अजित पवार Frequent floods Find a place to rehabilitate houses: Ajit Pawar
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या  घरांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधा ः अजित पवार Frequent floods Find a place to rehabilitate houses: Ajit Pawar

सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना पुराचा वारंवार फटका बसतो, अशा घरांचे सर्व्हेक्षण करा. पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंच व सुरक्षित जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.  पलूस तालुक्यातील भिलवडी, माळवाडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या वेळी जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आदी उपस्थित होते.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळवाडी येथील पूरग्रस्त निवारा केंद्राला भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. पूरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे? याची त्यांच्याकडून माहिती घेतली. तसेच भिलवडी गावातील पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याची आणि संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यांनी भिलवडी व पंचक्रोशीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या. 

उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली ठिकाणे  भिलवडी येथील बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून पाहणी केली. मिरज तालुक्यातील कवलापूर येथील नेहरू हायस्कूल, सांगली शहरातील स्टेशन चौक व दामाणी हायस्कूल येथील निवारा केंद्रास भेट देऊन लोकांशी संवाद साधला. पलूस ,कुंडल, दह्यारी, घोगाव , बांबवडे, पाचवा मैल, खंडोबाचीवाडी, माळवाडी ते भिलवडी, असा पवार यांनी मोटारीने प्रवास करून पूरग्रस्त भागाची व नुकसानीची माहिती घेतली. 

लोकांना तत्काळ मदत दिली  पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, ‘‘पूरपरिस्थिती नियंत्रण करण्यासाठी धरणक्षेत्रातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पूरग्रस्तांचे तातडीने प्रशासनामार्फत स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. या केंद्रामध्ये अन्न, पाण्याची मोफत सोय करण्यात आली आहे.’’  कृषी राज्यमंत्री कदम म्हणाले, ‘‘पलूस तालुक्यातील जवळजवळ २२ गावे पुराने सातत्याने प्रभावित होतात. व्यापार, बाजारपेठेमधील व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. शेती, पिके, व्यापार यांचे नुकसान झाले असून, बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यांतील काही गावे पूर रेषेत येतात त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे आवश्यक आहे.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com