Agriculture news in marathi Frequent floods Find a place to rehabilitate houses: Ajit Pawar | Page 3 ||| Agrowon

पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधा ः अजित पवार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंच व सुरक्षित जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. 

सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना पुराचा वारंवार फटका बसतो, अशा घरांचे सर्व्हेक्षण करा. पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंच व सुरक्षित जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. 

पलूस तालुक्यातील भिलवडी, माळवाडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या वेळी जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आदी उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळवाडी येथील पूरग्रस्त निवारा केंद्राला भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. पूरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे? याची त्यांच्याकडून माहिती घेतली. तसेच भिलवडी गावातील पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याची आणि संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यांनी भिलवडी व पंचक्रोशीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या. 

उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली ठिकाणे 
भिलवडी येथील बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून पाहणी केली. मिरज तालुक्यातील कवलापूर येथील नेहरू हायस्कूल, सांगली शहरातील स्टेशन चौक व दामाणी हायस्कूल येथील निवारा केंद्रास भेट देऊन लोकांशी संवाद साधला. पलूस ,कुंडल, दह्यारी, घोगाव , बांबवडे, पाचवा मैल, खंडोबाचीवाडी, माळवाडी ते भिलवडी, असा पवार यांनी मोटारीने प्रवास करून पूरग्रस्त भागाची व नुकसानीची माहिती घेतली. 

लोकांना तत्काळ मदत दिली 
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, ‘‘पूरपरिस्थिती नियंत्रण करण्यासाठी धरणक्षेत्रातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पूरग्रस्तांचे तातडीने प्रशासनामार्फत स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. या केंद्रामध्ये अन्न, पाण्याची मोफत सोय करण्यात आली आहे.’’ 

कृषी राज्यमंत्री कदम म्हणाले, ‘‘पलूस तालुक्यातील जवळजवळ २२ गावे पुराने सातत्याने प्रभावित होतात. व्यापार, बाजारपेठेमधील व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. शेती, पिके, व्यापार यांचे नुकसान झाले असून, बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यांतील काही गावे पूर रेषेत येतात त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे आवश्यक आहे.’’ 


इतर बातम्या
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त...नांदेड : जिल्ह्यात जुले, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये...
जळगावातील धरणांत ८० टक्के उपयुक्त...जळगाव ः जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत लावलेल्या...
ऊसबिलाचे तुकडे पाडू  दिले जाणार नाहीत...सातारा : ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत,...
'लासलगाव'च्या कांद्याला टपाल पाकिटावर...नाशिक : कांदा पिकासाठी लासलगाव परिसराची राष्ट्रीय...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...