‘मुळा’च्या उजव्या कालव्यातून शुक्रवारी आवर्तन

Friday rotation from the right canal of the 'Mula'
Friday rotation from the right canal of the 'Mula'

राहुरी, जि. नगर : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी सिंचनाचे आवर्तन शुक्रवारपासून (ता. २०) सोडणार आहे, अशी माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. या वर्षी पाणी उपलब्ध असल्याने अधिकाऱ्यांकडून पाणी बचतीचा प्रयत्न केला जात आहे. 

देशमुख म्हणाले, ‘‘मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून १० मार्च रोजी सिंचनाचे आवर्तन सुरू केले आहे. उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू करण्याची मागणी होत होती. उजव्या कालव्याच्या मागील आवर्तनात काही ठिकाणी भराव खचला आहे. मागील हंगामापूर्वी भरावाचे काम करूनही त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा भराव खचले आहेत. त्या ठिकाणी मातीमिश्रित वाळू असल्याने असे प्रकार वारंवार होतात. अशा ठिकाणी भरावाची कामे सुरू आहेत. उन्हाळी हंगामाच्या आवर्तनापूर्वी ही कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. कामे पूर्ण न झाल्यास कालवा फुटीचा धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. कालव्यावरील विमोचकांच्या द्वारांची दुरुस्तीची कामेही सुरू आहेत. ही सर्व कामे गुरुवारपर्यंत (ता. १९) पूर्ण होतील.’’

पालकमंत्री हसन मुश्रीफ व कार्यक्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधींसमवेत चर्चा झाली आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार, उजव्या कालव्याचे नियोजित आवर्तन २५ मार्चऐवजी २० मार्चलाच सोडले जाईल. कमीत कमी पाण्यात हे आवर्तन करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. या आवर्तनात ओढे-नाले, गावतळी भरण्यात येणार नाहीत. अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर व कालव्याचे नुकसान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. मुळा उजव्या कालव्याची वहनक्षमता १६५० क्‍यूसेक आहे. आवर्तन ४० दिवस चालेल. सुरवातीला १४०० क्‍युसेकने पाणी सोडले जाईल. नंतर टप्प्या-टप्प्याने पूर्ण वहनक्षमतेने कालव्याचा विसर्ग वाढविला जाईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com