जळगावात मेथी २००० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल

जळगावात मेथी २००० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल
जळगावात मेथी २००० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.१) मेथीची पाच क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २१०० ते ३४०० रुपये दर होता. आवक पाचोरा, जामनेर,  एरंडोल, जळगाव आदी भागांतून झाली. आवक जूनपासून कमीच असून, दरही स्थिर आहेत, अशी माहिती मिळाली. 

बाजारात गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल २५०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. संकरित प्रकारच्या गवारीचे दर कमाल २६०० पर्यंत राहिले. शेवग्याची दोन क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १६५० ते २५०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची १५ क्विंटल आवक झाली. दर ९०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. बिटाची पाच क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाला.

लिंबांची सहा क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २००० ते ३१०० रुपये दर होता. वांग्यांची नऊ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल १४०० ते २७०० रुपये दर मिळाला. आल्याची १७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २३०० ते ५१०० रुपये दर मिळाला. बटाट्याची ३१२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ६०० ते १२५० रुपये दर होता. भेंडीची १२ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० ते १६५० रुपये मिळाला.  

काशीफळाची ३१ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल ५०० ते ९०० रुपये होता. टोमॅटोची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७५० ते ११५० रुपये दर होता. पालकाची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. हिरव्या मिरचीची ३१ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ७०० ते १३०० रुपये दर मिळाला.

डाळिंबाची २१ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २२०० ते ५०५० रुपये दर मिळाला. कोबीची १५ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १५५० ते २७०० रुपये मिळाला. गाजराची १३ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ८५० ते १३५० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com