साखर जप्त करून देणार एफआरपी ः सहकारमंत्री देशमुख

साखर जप्त करून देणार एफआरपी ः सहकारमंत्री देशमुख
साखर जप्त करून देणार एफआरपी ः सहकारमंत्री देशमुख

नाशिक : वसंतदादा पाटील साखर कारखान्याने पुरवठादार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम अदा न केल्याने या अन्यायाबाबत आमदार चव्हाण यांनी बुधवारी (ता. २६) तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाला जाब विचारला. यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आ. चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारखान्याची साखर जप्त करून शेतकऱ्यांची रक्कम अदा करण्यात येणार असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.         आमदार चव्हाण यांनी बुधवारी (ता. २६) तारांकित प्रश्न उपस्थित करून वसंतदादा पाटील साखर कारखान्याकडून पुरवठादार शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याने सन २०१८-२०१९ च्या गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा केलेल्या बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देय रक्कम अदा केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. हे खरे आहे काय, असा प्रश्न आ. चव्हाण यांनी उपस्थित केला. माहे जानेवारी २०१९ नंतर पुरवठा केलेल्या उसाची देय रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली नसून कारखान्याने अदा केलेले धनादेश वटत नसल्याची तक्रार साक्री तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणी चौकशी केली आहे का? आणि त्या अनुषंगाने ऊसउत्पादक शेतकऱ्यांची देय रक्कम त्वरित देण्याबाबत कोणती कारवाई केली, असा सवालही आ. चव्हाण यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. आ.चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाचे उत्तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याकडे दिनांक १५-०२-२०१९ अखेर ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे हंगाम २०१८-२०१९ मध्ये गाळप केलेल्या उसाचे देय एफआरपीप्रमाणे ९७५.८८ लाख रुपये थकीत होते. दरम्यान, कारखान्याने ऊस बिलाची रक्कम अदा केली नसल्याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. असे सांगून थकीत एफआरपी संदर्भात कारखान्याविरुद्ध ऊस (नियंत्रण)आदेश, १९६६ अन्वये (दिनांक २५-०३-२०१९)चे आरआरसी आदेशानुसार ९७५.८८ लाख रक्कम वसुलीकरिता जिल्हाधिकारी, नाशिक यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.  त्या अनुषंगाने देवळ्याच्या तहसीलदारांनी कारखान्याची साखर जप्त करून साखर विक्रीतून प्राप्त ९२२.७८ लाख रकमेतून ऊसपुरवठादारांना एफआरपीची रक्कम अदा करण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही शेवटी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सभागृहाला सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com