agriculture news in Marathi, FRP interest issue become in Sugar commissioner , Maharashtra | Agrowon

एफआरपीच्या व्याजाबाबत साखर आयुक्तालयात पेच

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

पुणे  : उसाच्या थकीत एफआरपीचे विलंब व्याज शेतकऱ्यांना देण्याबाबत कायदेशीर तरतूद असली तरी त्याचे पालन कसे करावे, असा पेच साखर आयुक्तालयासमोर तयार झाला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी आयुक्तालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने शेतकऱ्यांचे लक्ष पुढील घडामोडींकडे लागून आहे. 

पुणे  : उसाच्या थकीत एफआरपीचे विलंब व्याज शेतकऱ्यांना देण्याबाबत कायदेशीर तरतूद असली तरी त्याचे पालन कसे करावे, असा पेच साखर आयुक्तालयासमोर तयार झाला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी आयुक्तालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने शेतकऱ्यांचे लक्ष पुढील घडामोडींकडे लागून आहे. 

१४ दिवसांत एफआरपीचे पेमेंट न केल्यास प्रतिवर्षी १५ टक्के व्याज शेतकऱ्यांना द्यावे लागेल, अशी तरतुद केंद्र शासनाच्या ऊस नियंत्रण कायद्यात आहे. मात्र, राज्यात या तरतुदीचे पालन होत जात नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले, विधिज्ञ रामराजे देशमुख व शुंभूराजे देशमुख यांनी एका याचिकेद्वारे सर्वप्रथम हा मुद्दा उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. 

“साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे निश्चित किती विलंब व्याज थकविले आहे याविषयी अधिकृत माहिती शासनाने जाहीर केलेली नाही. साखर आयुक्तालयाने देखील त्याविषयी माहिती दिलेली नाही. अभ्यासकांच्या मते नांदेड विभागात ८० कोटी तर राज्यात ७०० कोटींच्या आसपास विलंब व्याज थकीत असावे. कायद्यातील सोयीच्या तरतुदी कारखाने वापरतात. मात्र, व्याज अदा करण्याच्या शेतकरी हिताच्या नियमात खोडा घातला गेला आहे,” अशी टीका श्री. इंगोले यांनी केली आहे. 

उच्च न्यायालयाने विलंब व्याजाबाबत याचिकेवर सुनावणी घेताना साखर आयुक्तांना १२ आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आयुक्तालयाने २६ ऑगस्टला पहिली सुनावणी घेतली. मात्र, बुधवारची (ता. ११) सुनावणी पुढे ढकलण्यात आली. “विलंब व्याजाबाबत साखर कारखाने सतत वेगवेगळे कारण पुढे करीत आहेत. साखर आयुक्तालयाकडून देखील यापूर्वी चुकीची माहिती न्यायालयाला दिली गेली आहे. आता मात्र वेळेत निर्णय न झाल्यास आम्ही अवमान याचिका दाखल करू,” अशी माहिती विधिज्ञ रामराजे देशमुख यांनी दिली. 

दरम्यान, बुधवारच्या सुनावणीस साखर आयुक्त उपस्थित राहू न शकल्यामुळे येत्या १८ सप्टेंबरला पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे. प्रतिवादी साखर कारखान्यांपैकी काही कारखान्यांनी आपले लेखी म्हणणे साखर आयुक्तांकडे दिले आहे. विलंब व्याजाचा मुद्दा नांदेडमधील २०१४-१५ च्या थकीत एफआरपीपासून पुढे आला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी वर्गणी काढून याचिका दाखल केल्याने या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुष्काळ, साखरेचे कमी दर तसेच इतर आर्थिक अडचणींमुळे विलंब व्याज देता येत नसल्याची व्यथा साखर कारखाने मांडत आहेत.

दुसऱ्या बाजूला व्याजाबाबत कायदा स्पष्टपणे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. मात्र, कायद्यानुसार कारखान्यांवर कारवाई केल्यास राजकीय हस्तक्षेप होतो. त्यामुळे विलंब व्याजाबाबत साखर आयुक्तालय गेल्या तीन वर्षांपासून तळ्यातमळ्यात भूमिका घेत असल्याचे शेतकरी प्रतिनिधींचे म्हणणे आहे.  

सदस्यांनी न्यायालयात मांडलेले मुद्दे
 १४ दिवसांत एफआरपी न दिल्यास १५ टक्के व्याजाची तरतूद  
 या तरतुदीच्या पालनाकडे राज्यात दुर्लक्ष होत असल्याची तक्रार 
 थकीत व्याजाची माहिती साखर आयुक्तालय, शासनाने दडविली
 नांदेड विभागात ८० कोटी व्याज थकीत असण्याची शक्यता
 आयुक्तालयाने न्यायालयात चुकीची माहिती दिली
 वेळेत निर्णय न झाल्यास अवमान याचिका दाखल करणार


इतर अॅग्रो विशेष
देशात यंदा कापूस लागवड वाढणारजळगाव ः देशात २०२०-२१च्या हंगामात कापसाचे उत्पादन...
खासगीकरणाच्या मार्गावर प्रश्‍नांचे धुके‘कोरोना’ग्रस्त भारत, गलितगात्र विरोधी पक्ष आणि...
ड्रॅगनचा विस्तारवादसी मावादावरून भारत आणि चीनचे लष्कर आमने सामने आले...
गोदामाअभावी मका खरेदी बंद चंद्रपूर ः गोंड पिंपरी तालुक्यातील भंगाराम...
महाराष्ट्रात केसर आंब्याच्या क्षेत्रात...नगर ः फळपिकांत आंबा महत्त्वाचे पीक आहे. त्यामुळे...
आपले सरकार सेवा केंद्रांची होणार तपासणी पुणे ः पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अनेक...
कृषीमध्ये स्टार्टअप, उद्योजकतेला...नवी दिल्ली: नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि...
बागा पुनर्लागवडीसह सफाईसाठी अर्थसाह्य...रत्नागिरी ः निसर्ग चक्रीवादळात मंडणगड, दापोलीसह...
मुंबईसह कोकणात धुवांधार पुणे : कोकण किनारपट्टीवर दोन दिवसांपासून पावसाने...
देशात खरीप पेरणीला वेग नवी दिल्ली: यंदाच्या खरीप हंगामात परेणीने जोर...
सव्वालाख हेक्टरवरून टोळधाडीचे उच्चाटन नवी दिल्ली: सरकारने राजस्थान, मध्य प्रदेश,...
पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले...अल्प शेतीला एकात्मिक पद्धतीने पूरक उद्योगाची जोड...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे  अरबी समुद्रातून होत असलेला...
मुंबईसह, कोकणात दमदार पाऊसपुणे : कोकण किनारपट्टीलगतच्या समुद्रात...
राज्यातील शिल्लक कापसाविषयी संभ्रम नागपूरः राज्यात कापसाच्या शिल्लक साठ्याविषयी...
पीकविम्याच्या साइटवरून चार गावांची...बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यातील काही गावांतील...
पुणे जिल्हा परिषदेची ‘हर घर गोठे- घर घर...पुणे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी...
पंचनाम्याची प्रक्रिया संशयास्पद :...पुणे: राज्यातील सोयाबीन बियाणे उगवणीबाबत...
टाळेबंदीतही कारखान्यांकडून ९७ टक्के...कोल्हापूर: टाळेबंदीच्या संकटामध्येही यंदा...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...