एफआरपी कायदाच भाजपकडून मोडीत ः रघुनाथदादा पाटील

एफआरपी कायदाच भाजपकडून मोडीत ः रघुनाथदादा पाटील
एफआरपी कायदाच भाजपकडून मोडीत ः रघुनाथदादा पाटील

सातारा : शेतकऱ्यांना एफआरपीचा अधिकार देणारा कायदा भाजप सरकारने मोडीत काढला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे टनाला एक हजार रुपयांचे नुकसान होत आहे. या विरोधात आवाज उठविण्यासाठी शरद जोशींच्या जन्मदिनाचे औचित्य साधून येत्या तीन सप्टेंबरला पंढरपूर येथे शेतकरी संघटनेची शेतकरी परिषद होणार आहे. सत्ताधारी लुटारूंच्या विरोधात आवाज पर्याय उभा करण्याचा अजेंडा या परिषदेत ठरणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

काँग्रेस असो वा भाजप सर्वजण शेतकऱ्यांना लुटत आले आहेत. आता भाजपने शेतकऱ्यांना एफआरपीचा अधिकार देणारा पाच ब कायदा मोडीत काढला आहे. साडेनऊपेक्षा कमी रिकव्हरी मिळत असेल तर एफआरपी देण्याचा अधिकार कारखान्यांवर सोपविण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे टनाला एक हजार रुपये नुकसान होणार आहे. कारखानदार आणि भाजपवाले एक झाले आहेत. पूर्वीच्या सरकारमधील नेत्यांचे कारखाने होते आणि भाजपने कारखानदारांना विकत घेतले आहे. यामध्ये मुख्यमंत्री दोषी असून सर्व नवे शासन निर्णय शेतकरी विरोधात निघालेले आहेत. दरारोज नवीन कायदा काढून कायद्याने फसवणूक करण्याचे काम सुरू आहे. या प्रश्‍नांविरोधात आवाज उठविण्यासाठी शेतकरी संघटनेने येत्या तीन सप्टेंबरला पंढरपूर येथे शेतकरी परिषदेचे आयोजन केले आहे. 

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ही परिषद होत आहे. शेतकऱ्यांची संघटित ताकद उभी करण्यासाठी ही परिषद होत आहे. यामध्ये या लुटारूंविरोधात पर्याय उभा केला जाणार आहे. आमच्यातील काहीनेते मंडळी भाजपमध्ये गेली आणि शेतकऱ्यांना विसरली आहेत. 

आज नेते मंडळी जरी भाजपमध्ये जात असली तरी त्यांचा आगामी काळात भ्रमनिराश होणार आहे. शासनाच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून शासकीय निकषांनुसार मदतीसाठीपात्र आहेत की नाही याचा शोध अद्यापही सुरू आहे. आता याविरोधात शेतकऱ्यांनीच संघटित होऊन आवाज उठविला पाहिजे, असेही ते म्हणाले. या वेळी विकास आढाव, टी. के. आढाव, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com