‘एफआरपी'चे पैसे पाच सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मिळतील

‘एफआरपी'चे पैसे पाच सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मिळतील
‘एफआरपी'चे पैसे पाच सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मिळतील

सोलापूर : राज्यातील साखर कारखान्यांना एफआरपीचे पैसे देण्याबाबत सक्त ताकीद दिलेली आहे. कारखान्यांना पैशाची अडचण आहे. त्यासाठी राज्य बॅंकेलाही कारखान्यांना वाढीव कर्ज देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत येत्या पाच सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांचे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार ते मिळतील, असे राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. ‘‘तरीही कारखान्यांनी चालढकल केल्यास कारवाई करू``, असेही ते म्हणाले.

देशमुख म्हणाले, "गेल्या वर्षी नऊ लाख हेक्‍टरवर ऊस लागवड होती, यंदा हे क्षेत्र ११ लाख हेक्‍टरवरच पोचले आहे. सर्वाधिक ऊस औरंगाबाद जिल्ह्यात आहे. परंतु तेथील कारखान्यांची क्षमता पाहता, त्या भागातील संपूर्ण ऊस गाळप होऊ शकेल, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे यंदा लवकर गाळप हंगाम सुरू करण्याचे नियोजन केले आहे. १० ऑक्‍टोबरपासून हंगाम सुरू होईल. त्यामुळे मराठवाडाच नव्हे, तर राज्यातील अन्य भागांतील कोणत्याही शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत.

मराठा समाजाच्या मागण्या रास्त आहेत. मुख्यमंत्री सगळ्यांसोबत चर्चा करायला तयार आहेत. समाजाने आंदोलने शांततेत करावीत, असे आवाहनही देशमुख यांनी केले. शिक्षण संस्थांना ५० टक्के शुल्क शासन देणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रवेश रोखू नये, अशा सूचनाही शासनाने दिल्याचे त्यांनी सांगितले.

आतापर्यंत महामंडळाकडे १२ हजार ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या तुलनेत कर्ज वाटप करण्यात अपयश आल्याची कबुलीही सहकारमंत्र्यांनी दिली. मात्र, यापुढे विनातारण कर्ज देण्यात येणार असल्याने ही संख्याही निश्‍चितच वाढेल, असेही त्यांनी सांगितले. आरक्षणाच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याला उशीर होत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com