Agriculture news in Marathi FRP pending from 11 sugar factorys in sangli district | Agrowon

सांगलीतील अकरा कारखान्यांकडे २६५ कोटींची एफआरपी थकली 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

सांगली ः जिल्ह्यातील साखर हंगाम संपला असला तरी, शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळालेली नाही. फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऊस बिलाची रक्कम थकीत आहे. जिल्ह्यातील ११ कारखान्यांकडे एफआरपीचे २६५ कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या रकमेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. 

सांगली ः जिल्ह्यातील साखर हंगाम संपला असला तरी, शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळालेली नाही. फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऊस बिलाची रक्कम थकीत आहे. जिल्ह्यातील ११ कारखान्यांकडे एफआरपीचे २६५ कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या रकमेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. 

जिल्ह्यात यंदा १२ साखर कारखान्यांनी साडेतीन ते चार महिन्यांचा गळीत हंगामात ६६ लाख ७९ हजार ३८५ टन उसाचे गाळप करून ८२ लाख ४६ हजार ८४९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर चार कारखाने यंदा सुरू होऊ शकले नाहीत. ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या कलम ३ (३) मधील तरतुदीनुसार हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलाची रक्कम १४ दिवसांत शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. वेळेत एफआरपीची रक्कम न दिल्यास कलम ३ (३ ए) नुसार विलंब कालावधीसाठी १५ टक्‍के व्याज आकारण्याची तरतूद आहे. 

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊस बिलाची रक्कम दिली नाही, त्यांनी तत्काळ द्यावी, असे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना यापूर्वीच दिले आहेत. मात्र, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे चित्र आहे. 

संपलेल्या हंगामात उसाचे उत्पादन घटल्याचे चित्र दिसून आले. महापूर आणि अवकाळी पावसामुळे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कारखान्यांचा हंगामही महिनाभर उशिराने सुरू झाला. शेतकरी संघटनांनी एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी केली. परंतु जिल्ह्यात त्यावर तोडगा निघाला नाही. हंगाम सुरू झाल्यानंतर दत्त इंडिया व निनाईदेवी- दालमिया या दोन कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिली. इतर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे पाडले. दोन किंवा तीन टप्प्यात एफआरपी देण्याचे ठरले. काही कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून तसे लेखी लिहून घेतले. 

सद्य:स्थितीत फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर जिल्ह्यातील ११ कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही रक्कम २६५ कोटी रुपये इतकी आहे. शेतकरी अडचणीत असल्यामुळे त्यांना तत्काळ रक्कम देण्याचे आदेश देऊनही त्याचे पालन केले नसल्याचे दिसून येते. सध्या शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी तसेच खरीप हंगामातील पिकाच्या बियाणांसाठी पैशाची मोठी गरज आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...