agriculture news in marathi, frp pending status, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम थकीत
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

पुणे   ः जिल्ह्यात गळीत हंगाम संपवून पंधरा दिवस होऊन गेले. या हंगामात गाळप केलेल्या १७ साखर कारखान्यांपैकी १४ साखर कारखान्यांकडे अजूनही ३४९ कोटी रुपयांची एफआरपीची रक्कम थकीत आहे. आतापर्यंत अवघ्या तीन कारखान्यांनी रक्कम दिली आहे. यामध्ये भीमाशंकर, संत तुकाराम आणि सोमेश्वर या तीन साखर कारखान्यांचा समावेश आहे, अशी माहिती पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

पुणे   ः जिल्ह्यात गळीत हंगाम संपवून पंधरा दिवस होऊन गेले. या हंगामात गाळप केलेल्या १७ साखर कारखान्यांपैकी १४ साखर कारखान्यांकडे अजूनही ३४९ कोटी रुपयांची एफआरपीची रक्कम थकीत आहे. आतापर्यंत अवघ्या तीन कारखान्यांनी रक्कम दिली आहे. यामध्ये भीमाशंकर, संत तुकाराम आणि सोमेश्वर या तीन साखर कारखान्यांचा समावेश आहे, अशी माहिती पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात १५ मेअखेरपर्यंत एफआरपीपोटी दोन हजार ७५० कोटी रुपये दिले गेले. जिल्ह्यात पाच मे रोजी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम बंद झाला होता. राज्यात आणि जिल्ह्यात सर्वांत शेवटी गाळप हंगाम बंद करणारा हा कारखाना ठरला आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी एकूण एक कोटी वीस लाख ९१ हजार ३६० टन उसाचे गाळप केले. त्यापोटी देय एफआरपीची एकूण रक्कम तीन हजार ९९ कोटी रुपये एवढी झाली आहे. त्यापैकी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर दोन हजार ७५० कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. 

१४ कारखान्यांकडे ३० एप्रिलअखेर एफआरपीचे ३६० कोटी रुपये थकीत राहिले होते. त्यातील आणखी ११ कोटी रुपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिले. ३४९ कोटी रुपये थकीत आहेत. केंद्र सरकारच्या सॉफ्ट लोन योजनेत पात्र कारखान्यांच्या यादीत पुणे जिल्ह्यातील कारखान्यांचाही समावेश आहे. त्यामुळे योजनेतील प्रस्तावास मंजुरी मिळून कर्ज रक्कम प्राप्त होताच थकीत एफआरपीची रक्कम कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कारखानानिहाय थकीत रक्कम (कोटीमध्ये) : श्री छत्रपती ३५.७१, घोडगंगा २६.५९, कर्मयोगी ६४.६३, माळेगाव ११.५६, नीरा भीमा १९.३९, राजगड ७.८४, विघ्नहर ५७.४६, भीमा पाटस ७.७२, श्रीनाथ म्हस्कोबा २३.६८, अनुराज शुगर्स १६.७४, बारामती ३९.०३, दौंड शुगर्स २५.७५, व्यंकटेश कृपा १२.३२, पराग अॅग्रो ०.६७.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...