agriculture news in marathi, frp problem will be solved of twenty sugar factories, pune, maharashtra | Agrowon

वीस कारखान्यांच्या ‘एफआरपी’चा तिढा सुटणार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

एफआरपी देण्यासाठी साखर आयुक्तालयाने चुकीच्या पद्धतीने मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावल्या. आमच्या नॅचरल शुगरलादेखील १६ कोटीची चुकीची नोटीस काढल्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता केंद्र शासनानेच बाजू स्पष्ट केली आहे. त्यामुळे आयुक्तालयाने मनमानीपणे केलेली सर्व कारखान्यांवरील कारवाई तात्काळ मागे घ्यावी.
-  बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा)

पुणे  : उसाच्या एफआरपी वसुलीसाठी चुकीची पद्धत वापरली गेल्याचा मुद्दा केंद्र सरकारने ग्राह्य धरल्यामुळे राज्यातील २० साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे थकीत एफआरपीप्रकरणी या कारखान्यांना साखर आयुक्तालयाकडून बजावलेल्या मालमत्ता जप्तीच्या नोटिसा मागे घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील साखर कारखान्यांनी २०१७-१८ मध्ये ऊस गाळप केल्यानंतर शेतकऱ्यांना एफआरपीपोटी २१ हजार २५१ कोटी रुपयांचे वाटप करणे अपेक्षित होते. मात्र, सध्या ५१ कारखान्यांकडे ४३७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यातील काही कारखान्यांना मालमत्ता जप्तीच्या (आरआरसी) नोटिसादेखील बजावण्यात आलेल्या आहेत.

प्रत्येक कारखान्याची वैयक्तिक एफआरपी काढली जाते. त्यासाठी मागील गाळप हंगामाचा उतारा गृहीत धरला जातो. राज्यातील २० साखर कारखान्यांनी २०१६-१७ गाळप घेतले, पण त्यांनी २०१५-१६ मधील हंगाम मात्र बंद ठेवला होता. त्यामुळे मागील वर्षाचा उतारा गृहीत धरता येणार नाही, असा युक्तिवाद या कारखान्यांचा होता.

`आम्ही २०१६-१७ च्या हंगामात गाळप केलेले नाही. त्यामुळे २०१५-१६ या हंगामातील हिशेब गृहित धरून एफआरपी काढावी, अशी मागणी आम्ही साखर आयुक्तालयाकडे केली होती. ती फेटाळण्यात आली. त्यामुळे आमच्यावरील कारवाई बेकायदा आणि अयोग्य असल्याची तक्रार केली होती,` असे कारखान्यांच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

साखर आयुक्तालयाने याबाबत १९ जुलै २०१८ रोजी केंद्रीय अन्न मंत्रालयाला पत्र लिहून मार्गदर्शन मागितले. अन्न मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव जितेंदर जुएल यांनी ७ सप्टेंबर २०१८ रोजी साखर आयुक्तालयाला पत्र पाठवून साखर कारखान्यांची मागणी रास्त असल्याचे स्पष्ट केले. `हंगाम बंद असलेल्या आधीच्या वर्षाचा उतारा किंवा बंद हंगामातील त्या जिल्ह्यातील चालू कारखान्यांचा सरासरी उतारा गृहीत धरून यापैकी जो उतारा जादा असेल तो ग्राह्य धरून एफआरपी काढावी,` असे नमूद करण्यात आले आहे.

`आम्ही २०१५-१६ चा हिशेब गृहीत धरून शेतकऱ्यांना पेमेंटदेखील केलेले आहे. मात्र, साखर आयुक्तालयाने २०१७-१८ च्या हंगामातील हिशेबावर आधारित पेमेंट करण्याचा चुकीचा आग्रह केला गेला. केंद्र शासनाच्या पत्रामुळे आमची बाजू योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे,` असे कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
साखर निर्यातीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढकोल्हापूर : पावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ...
काजू उत्पादन ३० टक्क्यांनी घटणारसिंधुदुर्ग : जुलै, ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी,...
द्राक्ष बागांचे पंचनामे करताना दिशाभूलनाशिक  : द्राक्ष बागांचे पंचनामा केल्यास...
कृषी कौशल्य प्रशिक्षणांद्वारे उभी...केंद्र शासनाची प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना २....
गारठा वाढला; नगर येथे नीचांकी तापमानपुणे  : उत्तरेकडून येणारे थंड वारे,...
पावसाने द्राक्ष शेतीचे ९ हजार कोटींवर...पुणे : सततच्या पावसामुळे सर्व अवस्थांमधील द्राक्ष...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांना...कोल्हापूर: कर्नाटकने झोनबंदी केल्याने सीमाभागातून...
पीक नुकसानीचा अंतिम अहवाल लांबण्याची...पुणे : राज्यात अतिपावसामुळे झालेल्या पिकांच्या...
शासकीय खरेदीसाठी उडीद, सोयाबीनची...परभणी: किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत...
राज्यात बहुतांंश भागांत तापमान २०...पुणे : राज्यात दोन दिवसांपासून किमान तापमान कमी...
पावसाचा सोयाबीन उत्पादकांना २२ हजार...पुणे : राज्यातील खरिपात दुसरे महत्त्वाचे पीक...
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला...पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा...
जन्मभूमी रामलल्लाचीच; 'अयोध्या' प्रकरणी...नवी दिल्ली : भारतवर्षाचा राजकीय भूगोल बदलून...
मराठवाड्यातील उपयुक्‍त पाणीसाठा ७१ टक्‍...औरंगाबाद  : संपूर्ण मराठवाड्यात ऑक्‍टोबर...
कांदा साठवणुकीच्या संदर्भात प्रशासन...नाशिक : कांदा दर नियंत्रणासाठी निर्यातबंदी नंतर...
हळद पावडर उद्योगात तयार केली ओळखसांगलीची बाजारपेठ हळकुंड आणि हळद पावडरीसाठी देश-...
शेतीपूरक व्यवसायासाठी मिळणार अनुदानपुणे ः शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-...
शेती, शिक्षण अन ग्रामविकासामध्ये...समानता, स्वातंत्र्य आणि सहानुभूतीमुळेच व्यक्तीचा...
चक्रीवादळे, मुसळधारेने ‘भाता’चे कंबरडे...रत्नागिरी : राज्यातील आठ विभागांपैकी पाच विभागांत...
‘बुलबुल’ चक्रीवादळामुळे पूर्व, ईशान्य...पुणे: बंगालच्या उपसागरातील ‘बुलबुल’ अतितीव्र...