मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली 

मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा, यासाठी भाजीपाला आणि अन्नधान्याचा बाजार सुरळीत सुरू केल्यानंतर आता घाऊक बाजारातील फळ बाजारही पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. भाजीपाल्याप्रमाणे फळांच्या बाजारातही गाड्यांच्या आवकीवर मर्यादा आली आहे. घाऊक फळ बाजारात गुरुवारी कलिंगड, टरबूज, संत्री आणि द्राक्षांची चांगली आवक झाली. यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळताना दिसत आहे.
Fruit arrivals increased in Mumbai Market Committee

उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात मोठ्या प्रमाणात रसदार फळांना मागणी असते. आंब्याबरोबरच कलिंगड, टरबूज, खरबूज, पपई या फळांचीही आवक या मोसमात होते. मात्र, सध्याच्या लॉकडाऊनमुळे या फळांची आवक कित्येक दिवस थांबली होती. अधूनमधून दहा-वीस गाड्या फळे बाजारात येत होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय व्यापाऱ्यांनाही बाजार नसल्याने आर्थिक फटका बसत होता. आता बाजारातील परिस्थिती सुधारत असल्याने बाजारातील मोजक्या व्यापाऱ्यांनी फळे मागवायला सुरुवात केली आहे. ४० ते ४५ टक्के फळांची आवक घाऊक बाजारात होत आहे. 

घाऊक फळ बाजारात गुरुवारी सर्व नियमांचे पालन करून २०७ फळांच्या गाड्या आल्याची नोंद बाजार समितीने केली. या पैकी १७३ फळांच्या गाड्या फळे घेऊन मुंबई आणि उपनगरात पाठवल्या गेल्या आहेत. फळांचा ७० टक्के व्यवसाय रस्त्यावर बसणाऱ्या, डोक्यावर टोपली घेऊन फिरणाऱ्या फेरीवाल्यांकडून होतो. मात्र, हे फेरीवाले गावी गेल्याने आता त्यांच्याकडून खरेदीसाठी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे घाऊक फळ बाजारात बाजारात येणाऱ्या मालाच्या प्रमाणात खरेदीदार कमी संख्येने येत असल्याची माहिती घाऊक व्यापारी शिवाजीराव चव्हाण यांनी दिली. मात्र, असे असले तरी जो काही थोडा माल येतो, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. 

अनेक शेतकऱ्यांच्या बागेत फळे तयार झाली आहेत. ती लगेच विकली गेली नाहीत तर ती शेतातच खराब होतील. लागवडीवर केलेला खर्चही वाया जाईल. त्यामुळे थोड्या थोडक्या प्रमाणात तरी फळांना बाजार मिळावा, असे शेतकरी सांगत आहेत. आता घाऊक बाजार सुरू झाल्याने शेतकरी आणि व्यापारी यांना दिलासा मिळाला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com