Agriculture news in Marathi Fruit crop insurance scheme for farmers or for the benefit of companies? : Vikhe Patil | Page 2 ||| Agrowon

फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्‍यांच्‍या लाभासाठी? ः विखे पाटील

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ होऊ शकणार नाही अशी भावना शेतकऱ्यांमध्‍ये निर्माण झाली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी की विमा कंपन्‍यांच्‍या लाभासाठी? असा प्रश्‍न माजी मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्‍यासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील नव्‍या प्रमाणकांचा (ट्रीगर) तातडीने फेरविचार करून सुधारित निकष जाहीर करावेत, अशी मागणीही त्‍यांनी पत्राव्‍दारे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍याकडे केली आहे.

नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ होऊ शकणार नाही अशी भावना शेतकऱ्यांमध्‍ये निर्माण झाली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी की विमा कंपन्‍यांच्‍या लाभासाठी? असा प्रश्‍न माजी मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्‍यासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील नव्‍या प्रमाणकांचा (ट्रीगर) तातडीने फेरविचार करून सुधारित निकष जाहीर करावेत, अशी मागणीही त्‍यांनी पत्राव्‍दारे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍याकडे केली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, राज्‍य सरकारने यावर्षी पुर्नरचित हवामान आधारित फळ‍पीक विमा योजना लागू केली आहे. मात्र, योजनेतील निकष पाहिले तर सदरची विमा योजना ही शेतकऱ्यांच्‍या नव्‍हे तर कंपन्‍यांचे हित जोपासणारी असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसते. फळपीक नुकसान संरक्षण कालावधीत भरपाई प्राप्‍त होण्‍यासाठी निश्चित केलेले प्रमाणके (ट्रीगर) हे वास्‍तव हवामान परिस्थितीच्‍या विपरित आहेत. पूर्वी या योजनेसाठी पावसाचा निकष दोन दिवसांसाठी होता, शिवाय पावसाचा खंड हे प्रमाणक होते. शासनाने यावर्षी या योजनेसाठी लागू केलेल्‍या निकषात जास्‍त पावसाचे निश्चित केलेले प्रमाणकच योजनेच्‍या लाभासाठी अडचणीचे ठरणार असल्‍याकडे विखे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

कमी पावसाच्‍या व कोरडवाहू शेतकरीच प्रामुख्‍याने फळ पिकांची लागवड करत असतो. वित्‍तीय संस्थांकडून कर्ज घेऊन या फळपिकांची जोपासना केली जाते. दरवर्षी कर्जदार शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेतील सहभाग सक्‍तीचा केला जातो. यावर्षी मात्र कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग ऐश्चिक ठेवण्‍यात आला आहे. ही बाब‍ शेतकऱ्यांबरोबरच बॅंकांनासुद्धा कर्जवसुलीसाठी अडचणीची ठरेल, फळपिकांच्‍या भरपाईसाठी निश्चित केलेले प्रमाणके स्‍थानिक हवामानाच्‍या विपरीत असून, विमा योजनेचा मूळ हेतूच या नव्‍या निकषांमुळे संपुष्‍टात आलेला आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...
रासायनिक खतांचा योग्य वापर महत्त्वाचापिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे...
मका, सीताफळ, केळी, भाजीपाला पीक सल्ला (...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्‍त...
दूध प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप...नगर ः दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा...
सुपारी, आंबा, नारऴ, काजू फळबाग सल्ला (...ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या...
राज्यात लिंबं २०० ते १६०० रूपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ७०० रुपये दर...
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...