परभणी जिल्ह्यात फळपिकविमा योजना लागू

परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिकविमा योजना सन २०२०-२१ अंतर्गंत जिल्ह्यातील मोसंबी, संत्रा, केळी, डाळिंब, आंबा या पाच पिकांचा समावेश आहे.
 Fruit crop insurance scheme implemented in Parbhani district
Fruit crop insurance scheme implemented in Parbhani district

परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिकविमा योजना सन २०२०-२१ अंतर्गंत जिल्ह्यातील मोसंबी, संत्रा, केळी, डाळिंब, आंबा या पाच पिकांचा समावेश आहे. इच्छूक कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना बॅंकेत केळी आणि मोसंबीसाठी ३१ ऑक्टोबर, संत्र्यासाठी ३० नोव्हेंबर, आंबा आणि डाळिंबासाठी ३१ डिसेंबरपर्यंत विमा प्रस्ताव सादर करता येतील, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी केले.

अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामात विमा संरक्षणासाठी अर्ज करता येतील. शेतकऱ्यांना विमा प्रस्ताव बॅंका तसेच आपले सरकार केंद्र या सारख्या जनसुविधा केंद्रांवर सादर करता येतील. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा बॅंक, राष्ट्रीयकृत बॅंकांशी संपर्क साधावा, असे आवाहन आळसे यांनी केले.

फळपिकनिहाय अधिसूचित मंडळे

केळी ः परभणी, पेडगाव, जांब, सिंगणापूर, दैठणा, पिंगळी, झरी, जिंतूर, बोरी, सावंगी म्हाळसा, सेलू, कुपटा, मानवत, केकरजवला, रामपुरी, पाथरी, हादगाव, बाभळगाव, सोनपेठ, आवलगाव, वडगाव, गंगाखेड, महातपुरी, माखणी.

मोसंबी ः परभणी, झरी, जिंतूर, बोरी, सेलू,वालूर, कुपटा, मानवत, केकरजवळा, कोल्हा, पाथरी, हादगाव, पूर्णा, लिमला, चुडावा, कावलगाव.

संत्रा ः जांब, पेडगाव, दैठणा, जिंतूर, बोरी, सावंगी म्हाळसा, आडगाव, सेलू, कुपटा,वालूर, देऊळगाव गात, मानवत, केकरजवळा, कोल्हा, ताडबोरगाव,पुर्णा, कात्नेश्वर, चुडावा, कावलगाव.

डाळिंब ः चारठाणा, आडगाव, सेलू, 

आंबा ः परभणी, जांब, सिंगणापूर, दैठणा, पिंगळी, बोरी, सेलू, मानवत, केकरजवळा, सोनपेठ, आवलगाव, वडगाव, माखणी, पुर्णा, लिमला,  कात्नेश्वर, चुडावा.

फळपिकनिहाय प्रतिहेक्टर स्थिती 

फळपिक विमा संरक्षित रक्कम  विमा हप्ता अंतिम दिनांक
केळी १४०००० रुपये ७००० ३१ ऑक्टोंबर
मोसंबी ८०००० रुपये ४००० ३१ ऑक्टोंबर
संत्रा ८०००० रुपये ४०००  ३० नोव्हेंबर
आंबा १४०००० रुपये   ३१ डिसेंबर
डाळिंब १३०००० रुपये   ३१ डिसेंबर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com