Agriculture news in marathi, Fruit crop insurance scheme implemented in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात फळ पीकविमा योजना लागू

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

पुणे : जिल्ह्यातील द्राक्षे, डाळिंब, केळी, आंबा, मोसंबी, संत्री या अधिसूचित फळपिकासाठी पंतप्रधान फळ विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजना आंबिया बहारमध्ये लागू करण्यात आली आहे. फळ पीकनिहाय अधिसूचित महसूल मंडळामध्ये ही योजना राबविण्यात येईल. यामध्ये शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोके, कमी, जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या पासून निर्धारित केलेल्या कालावधीत विमा संरक्षण देण्यात येईल. 

पुणे : जिल्ह्यातील द्राक्षे, डाळिंब, केळी, आंबा, मोसंबी, संत्री या अधिसूचित फळपिकासाठी पंतप्रधान फळ विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजना आंबिया बहारमध्ये लागू करण्यात आली आहे. फळ पीकनिहाय अधिसूचित महसूल मंडळामध्ये ही योजना राबविण्यात येईल. यामध्ये शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोके, कमी, जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या पासून निर्धारित केलेल्या कालावधीत विमा संरक्षण देण्यात येईल. 

ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेडतर्फे राबविण्यात येत आहे. ती कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची असून बिगर कर्जदारांना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांचे अर्ज, विमा हप्ता ऑनलाइन पध्दतीने स्वीकारले जातील. सर्वसाधारण सेवा केंद्र सर्व गावांमध्ये सुरू होईपर्यंत बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा हप्त्याची रक्कम नजीकच्या बँक शाखेमध्ये भरावी. आपले सरकार सेवा केंद्र (डिजिटल सेवा केंद्र) वरही अर्ज भरता येतील. विमा अर्जासाठी सात बारा उतारा, आधार कार्ड, शेतकऱ्यांचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र व बँक खात्याचा तपशील ही कागदपत्रे आवश्यक असतील. अधिसूचित क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल यांनी केले.

फळ पीकनिहाय अधिसूचित तालुके 

फळ तालुका
आंबा  दौंड, आंबेगाव, भोर, जुन्नर, मावळ, खेड, हवेली, शिरूर, वेल्हा, मुळशी, बारामती, इंदापूर, सासवड
डाळिंब दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर, सासवड, हवेली, शिरूर, खेड
द्राक्षे  दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर
केळी दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर, हवेली, शिरूर, खेड
मोसंबी इंदापूर
संत्रा शिरूर

 


इतर बातम्या
मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘...पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता...
नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण,...नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती...
जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कांदा दरांवरील दबाव वाढलाजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
अकोला : शेतकरी कर्जमुक्ती योजनेत दोन...अकोला ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
गडहिंग्लजमध्ये यंदा अधिक पाणीसाठागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट...
यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३००...यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या...
मोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक...औरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची...
उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती...नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी...
डॉ. सूर्या गुंजाळ यांना केद्राई जीवन...नाशिक  : जिल्ह्यातील नांदूर खुर्द (ता. निफाड...
नांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत १.२६...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये...
नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार...नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या...
सांगलीत तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरूसांगली : नाफेड व स्टेट महाराष्ट्र स्टेट-को-ऑप....
‘भीमा’च्या कामगारांचे पैसे पाच...मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५...
सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप...मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव...
करमाळ्यात शुद्ध; पंढरपुरात सर्वांत...सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५...
शिवस्मारक निविदेत गैरव्यवहार नाही;...मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात...
तूर खरेदीसाठी हमी देण्याबाबत मंत्रिमंडळ...मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे...
पुणे जिल्ह्यात भाजीपाला पिकांकडे...पुणे ः गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोषक...