Agriculture news in marathi, Fruit crop insurance scheme implemented in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात फळ पीकविमा योजना लागू

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

पुणे : जिल्ह्यातील द्राक्षे, डाळिंब, केळी, आंबा, मोसंबी, संत्री या अधिसूचित फळपिकासाठी पंतप्रधान फळ विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजना आंबिया बहारमध्ये लागू करण्यात आली आहे. फळ पीकनिहाय अधिसूचित महसूल मंडळामध्ये ही योजना राबविण्यात येईल. यामध्ये शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोके, कमी, जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या पासून निर्धारित केलेल्या कालावधीत विमा संरक्षण देण्यात येईल. 

पुणे : जिल्ह्यातील द्राक्षे, डाळिंब, केळी, आंबा, मोसंबी, संत्री या अधिसूचित फळपिकासाठी पंतप्रधान फळ विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजना आंबिया बहारमध्ये लागू करण्यात आली आहे. फळ पीकनिहाय अधिसूचित महसूल मंडळामध्ये ही योजना राबविण्यात येईल. यामध्ये शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोके, कमी, जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या पासून निर्धारित केलेल्या कालावधीत विमा संरक्षण देण्यात येईल. 

ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेडतर्फे राबविण्यात येत आहे. ती कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची असून बिगर कर्जदारांना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांचे अर्ज, विमा हप्ता ऑनलाइन पध्दतीने स्वीकारले जातील. सर्वसाधारण सेवा केंद्र सर्व गावांमध्ये सुरू होईपर्यंत बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा हप्त्याची रक्कम नजीकच्या बँक शाखेमध्ये भरावी. आपले सरकार सेवा केंद्र (डिजिटल सेवा केंद्र) वरही अर्ज भरता येतील. विमा अर्जासाठी सात बारा उतारा, आधार कार्ड, शेतकऱ्यांचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र व बँक खात्याचा तपशील ही कागदपत्रे आवश्यक असतील. अधिसूचित क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल यांनी केले.

फळ पीकनिहाय अधिसूचित तालुके 

फळ तालुका
आंबा  दौंड, आंबेगाव, भोर, जुन्नर, मावळ, खेड, हवेली, शिरूर, वेल्हा, मुळशी, बारामती, इंदापूर, सासवड
डाळिंब दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर, सासवड, हवेली, शिरूर, खेड
द्राक्षे  दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर
केळी दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर, हवेली, शिरूर, खेड
मोसंबी इंदापूर
संत्रा शिरूर

 


इतर ताज्या घडामोडी
खेड येथे नुकसानीच्या प्रश्‍नांवर...पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे पिकांचे मोठे नुकसान...
माण- खटाव तालुक्‍यात बिलांअभावी...बिजवडी, जि.सातारा  : माण- खटाव तालुक्‍यात...
मराठवाड्यातील २२५ मंडळांत पुन्हा पाऊस,...औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण मंडळांपैकी...
परभणी, हिंगोली, नांदेडातील चक्रीवादळ...परभणी : गतवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात ‘...
नाशिकमध्ये सोयाबीनसह मका बियाण्यांच्या...नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन व मका...
अकोला जिल्ह्यातील पेरण्या रखडलेल्याच अकोला  ः जून महिना संपुर्ण उलटला, तरी...
वाशीममध्ये पीकविम्यासाठी ३१ जुलैपर्यंत...वाशीम : ‘‘जिल्ह्यात सन २०२०-२१ खरीप...
यवतमाळ जिल्ह्यात बियाणे न उगवण्याच्या...यवतमाळ : जिल्ह्यात उगवणविषयक तब्बल १५०० पेक्षा...
खानदेशात ८६ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणीजळगाव : खानदेशात पेरणी सुमारे ८६ टक्के क्षेत्रावर...
सांगलीत खरीप हंगामातील पीकविमा...सांगली : पंतप्रधान पीक विमा योजना जिल्ह्यात भात,...
सांगलीत ५ हजार हेक्‍टरवर उसाची लागवडसांगली  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑगस्ट...
कृषी विद्यापीठांमधील प्राध्यापकांची पदे...अकोला ः राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये जेआरए,...
राजवाडीत शेततळ्याच्या पाण्यावर भातशेतीरत्नागिरी : यंदा कोकणात पावसाने दमदार सुरुवात...
शेतकरी कर्जमाफीसाठी दोन हजार कोटी...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जनावरांच्या बाजारासह आठवडी बाजार बंदचनगर ः सलग दोन महिने लॉकडाउन करूनही कोरोना...
कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणकमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे...
राज्यात कांदा १०० ते ११०० रुपये क्विंटल पुणे : कोरोनामुळे विस्कळीत झालेली शेतमालाची...
हळदीला द्या शिफारशीत खतमात्रापावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलावा अभ्यासून पाणी...
कृषी सल्ला (कापूस, तूर, सोयाबीन, भुईमूग...पेरणीयोग्य पाऊस झालेल्या ठिकाणी वाफसा आल्यानंतर,...
जातिवंत वंशवृद्धीसाठी भ्रूण प्रत्यारोपण...साधारणपणे जातिवंत दुधाळू गाय एका वर्षात एकाच...