agriculture news in marathi, fruit crops become in trouble, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा धोक्यात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 एप्रिल 2019

माझ्याकडे एकूण ७० एकर डाळिंब, द्राक्षबाग आहे. आमच्याकडे कमी पाऊस झाल्यामुळे भीषण पाणीटंचाई आहे. कालव्याला पाणी आल्यामुळे शेततळे भरून ठेवले असून, फक्त झाडे जगविण्यासाठी चार ते पाच दिवसांतून ठिबकद्वारे पाणी देत आहे. शेततळ्यातील पाणी संपल्यावर फळबागा जगविण्यासाठी मोठे आव्हान उभे राहणार आहे.
- अतुल शिंगाडे, शेतकरी, शेळगाव, इंदापूर.

पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी भागात आॅक्टोबरपासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. याचा फळबागांना मोठा फटका बसत असल्याने फळबागा धोक्यात आल्या असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कृषी विभागाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

अनेक वर्षांपासून राज्य शासनाची रोजगार हमी योजना आणि केंद्र शासनामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडकरण्यात येत आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून रोजगार हमी योजना बंद करून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीला चालना देण्यात आली होती. याअंतर्गत दोन ते तीन वर्षांत पाच ते सहा हजार हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे. यापूर्वीही मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड झाली आहे. एक वर्षापासून राबविण्यात आलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून २८० शेतकऱ्यांनी १६२.९९ हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी तीव्र पाणीटंचाई होती.

याकाळात जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांहून अधिक क्षेत्रावरील फळबागा जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर होते. कृषी विभागापुढे याकाळात फळबागांना जीवदान देण्यासाठी तात्पुरत्या योग्य त्या उपाययोजना म्हणून शेततळ्यांचा पर्याय समोर आला होता. त्यामुळे कृषी विभागाच्या एनएमएच या अभियानाअंतर्गत शेततळ्यांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली. कृषी विभागाकडे मागील सात ते आठ वर्षांत सुमारे पाच हजारांहून अधिक शेततळी शेतकऱ्यांनी घेतल्याची नोंद आहे. त्यासाठी कृषी विभागाने अनुदानापोटी २० ते २५ कोटी रुपये खर्चही केले आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना शेततळ्यांचा आधार मिळाला. 

पाच ते सहा महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. विहिरी कोरड्या पडल्याने या शेततळ्यांकरिता पाणी मिळेनासे झाले आहे. काही ठिकाणी शेतकरी टॅंकरने पाणी विकत घेऊन फळबागा जगवू लागले आहेत. मात्र, त्यासाठी आर्थिक खर्च अधिक होत आहे. जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. याच भागात फळबागा व शेततळ्यांचे प्रमाण अधिक 
आहे. 

अनेक शेतकरी विहिरीतील पाणी उचलून शेततळ्यात टाकून पाणी ठिबकद्वारे पाणी फळबागांना देतात. सध्या विहिरी कोरड्या पडल्या असल्याने शेततळ्यात टाकायला पाणी उपलब्ध होण्याची शक्यता कमीच आहे. त्यातच कालव्याद्वारे पाणी मिळण्याचीही शक्यता कमी झाल्याने फळबागा जगविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले असून, कृषी विभागाने फळबागा जगविण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.  

पुणे जिल्ह्यातील सर्वच भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्याचा फटका रब्बी पिकांसह उन्हाळी पिकांना बसला असून आता फळबागांनाही बसू लागला आहे. त्यासंदर्भात तालुकास्तरावरून फळबागांची माहिती मागविली आहे, अशी माहिती  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी. जे. पडघडमल यांनी दिली.

 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...