agriculture news in Marathi fruit market of Mumbai will start from Monday Maharashtra | Agrowon

मुंबईत उद्यापासून फळ बाजार सुरु होणार

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 एप्रिल 2020

भाजीपाला, कांदा-बटाटा आणि अन्न-धान्य बाजारापाठोपाठ मुंबई बाजार समितीत येत्या सोमवारपासून (ता.२०) फळं बाजारही सुरु केला जाणार आहे.

मुंबई: भाजीपाला, कांदा-बटाटा आणि अन्न-धान्य बाजारापाठोपाठ मुंबई बाजार समितीत येत्या सोमवारपासून (ता.२०) फळं बाजारही सुरु केला जाणार आहे. दररोज अडीशे वाहनांनाच बाजार आवारात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच बाजारात खरेदीदारांची गर्दी टाळण्यासाठी खरेदीदारांना किमान पंधरा हजार रुपयांच्या शेतमाल खरेदीचे बंधन घालण्यात आले आहे. 

मुंबई आणि परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी १५ तारखेपासून भाजीपााला आणि कांदा-बटाटा तर १६ तारखेपासून अन्न-धान्य बाजार सुरु करण्यात आले आहेत. तर येत्या सोमवारपासून फळं बाजारही सुरु केला जाणार आहे. सध्या बाजार समितीत गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक बाजार येणाऱ्या वाहनांच्या संख्येवर नियंत्रण घालण्यात आले आहे. त्याच धर्तीवर फळं बाजारातही दररोज अडीचशे वाहनांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यंत या वाहनांना बाजारात प्रवेश दिला जाईल. 

बाजारात खरेदीदारांची गर्दी टाळण्यासाठी खरेदीदारांना किमान पंधरा हजार रुपयांची खरेदीचे बंधन घालण्यात आले आहे. त्यापेक्षा कमी रक्कमेचा खरेदी केलेला शेतमाल जप्त केला जाणार आहे. व्यापाऱ्यांना सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंतच व्यापार करता येणार आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनच्या सूचनांचे पालन करण्यासाठी गाळाधारकाने खरेदीदारांमध्ये तीन फूट सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे, अन्यथा गाळाधारकारचा परवाना निलंबित केला जाणार आहे. तसेच शेतमाल मागवण्यास प्रतिबंध घातला जाणार आहे. तसेच गाळाधारकांना गाळा अथवा परवाना भाड्याने देण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसे आढळून आल्यास गाळे ताब्यात घेऊन परवाना रद्द केला जाणार आहे. 

परवानाधारक अडते-व्यापारी यांनी त्यांचे मदतनीस, कामगार यांची स्वतः गाळाधारकाने कोरोना चाचणी करुन घ्यायची आहे. व चाचणी अहवाल बाजार समितीत दहा दिवसात सादर करायचा आहे. आदी विविध नियमांद्वारे बाजार समितीत कोरोना आणि लॉकडाऊनच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन बाजार समितीने केले आहे. बाजार समिती प्रशासन, फळ व्यापारी तसेच इतर संबंधित घटक यांच्या संयुक्त बैठकीत ही नियमावली निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसारच व्यापाऱ्यांना व्यवसाय करावा लागणार आहे.


इतर अॅग्रो विशेष
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...