अंबड परिसरात मोसंबी बागांत फळांचा सडा

अंबड, जि. जालना ः तालुक्यातील विहीर, कूपनलिकांच्या पाणी पातळीत भरघोस वाढ झाली आहे. त्याचे एकीकडे समाधान वाटत आहे, तर दुसरीकडे फळगळ होऊन झाडाखाली मोसंबींचा सडा पडत आहे.
 Fruit rot in citrus orchards in Ambad area
Fruit rot in citrus orchards in Ambad area

अंबड, जि. जालना  ः तालुक्यातील विहीर, कूपनलिकांच्या पाणी पातळीत भरघोस वाढ झाली आहे. त्याचे एकीकडे समाधान वाटत आहे, तर दुसरीकडे फळगळ होऊन झाडाखाली मोसंबींचा सडा पडत आहे. दुसरीकडे बाजारात मोसंबीला योग्य भाव मिळत नाही. यामुळे मोसंबी विक्री अभावी तशीच झाडाला लटकून आहे.

तालुका मोसंबी उत्पादनात अग्रेसर आहे. शेतकऱ्यांनी मोसंबी फळबागांची लागवड करून उत्पनाचे स्वप्न बाळगले. मात्र, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, भिषण पाणी टंचाई आदीवर शेतकऱ्यांनी मात केली. गत अनेक वर्षांपासून जोपासलेल्या फळबागांतून भरघोस उत्पन्न मिळेल, अशी अशा मोसंबी उत्पादक अंगी बाळगून होता. यावर्षी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला. 

मिळेना योग्य दर 

बाजारात मोसंबीला म्हणावा तसा योग्य भाव मिळत नसल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्याची चांगलीच अर्थिक कोंडी झाली आहे. बाजारात सध्या मोसंबीचे भाव प्रचंड गडगडले आहेत. ५  हजरांपासून ते १३ हजार रुपायांपेक्षा जास्त भाव मिळत नाही. दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती याचा सामना करत असताना कोरोनाने घाला घातल्याने होत्याचे नव्हते झाले आहे. डाग पडलेल्या मोसंबीला बाजारात टनाला पाच ते सात हजार रुपायांपेक्षा जास्तीचा भाव मिळत नाही. यामुळे केलेला खर्चही वसुल होईना गेला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com