agriculture news in Marathi fruits and Onion, Potato market started at Mumbai APMC Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मुंबई बाजार समितीत फळे, कांदा-बटाटा बाजार सुरु 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 मे 2020

गेल्या दहा दिवसांपासून बंद असलेले फळे आणि कांदा-बटाटा बाजार गुरुवारपासून (ता.२१) सुरु झाला आहे. इतक्या दिवसांनी फळे बाजार सुरु होत असताना व्यापाऱ्यांमध्ये मात्र उत्साह दिसून येत नाही.

मुंबई: गेल्या दहा दिवसांपासून बंद असलेले फळे आणि कांदा-बटाटा बाजार गुरुवारपासून (ता.२१) सुरु झाला आहे. इतक्या दिवसांनी फळे बाजार सुरु होत असताना व्यापाऱ्यांमध्ये मात्र उत्साह दिसून येत नाही. दिवसभरात बाजार समितीच्या सर्व आवारात मिळून सुमारे सातशे वाहने शेतीमालाची आवक झाली आहे. तर भाजीपाला बाजारातून आणि विविध चेकनाक्यावरुन सुमारे सहाशे वाहने भाजीपाला मुंबई शहरासाठी रवाना झाला आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ११ ते १७ हे हा आठवडाभर बंद करण्यात आली होती. सोमवारी (ता.१८) पासून समितीचे कामकाज टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा निर्णय होऊन भाजी, धान्य आणि मसाला बाजार सुरु करण्यात आले आहे.

तर दुसऱ्या टप्प्यात काल गुरुवारपासून (ता.२१) पासून फळे आणि कांदा बटाटा बाजार चालू झाले आहेत. या बाजार आवारांची वाहन प्रवेश मर्यादा कांदा बटाटा बाजार - १०० वाहने तर फळ बाजार आवार - २०० वाहने इतकी निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी फळे बाजारात २५५ वाहने आणि कांदा बटाटा बाजारात ७३ वाहने आली आहेत. 

मात्र, इतक्या दिवसांनी फळं बाजार सुरु करताना व्यापाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. मे महिना म्हणजे हापूस आंब्याचा हंगाम. या हंगामात बाजारात अगदी पाय ठेवायलाही जागा उरत नाही, इतक्या प्रमाणात बाजारात आंबे विक्रीसाठी येतात.

हापूस आंब्यापाठोपाठ कलिंगड, खरबूज, पपई ही फळेही येत असतात. या वर्षी तर मे महिन्यातच रमजान महिना आल्याने फळांना मोठी मागणी असणार म्हणून तीन महिने आधीपासून शेतकऱ्यांनी कलिंगड, खरबूज, पपई यांची लागवड केली होती. तीन महिन्यांत ही पिके निघतील आणि चांगला पैसा हातात येईल, अशी आशा होती. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वांचीच निराशा झाली. 

मार्च, एप्रिल तर गेलाच आणि आता हक्काचा मे महिनाही संपत आला आहे. त्यात दहा दिवस फळ बाजार बंद राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातला माल शेतातच पडून राहिला. जो माल खरेदी करुन नेला, त्यानंतर आता व्यापाऱ्यांनी पुन्हा माल उचलण्यास नकार दिला.

सुरुवातीला बाजार बंद असला तरी थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणारे लोकही आता शेतकऱ्यांकडे यायचे बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना आपला माल विकण्याची गळ घालायला सुरुवात केली आहे. व्यापारी मात्र व्यापार करायचा की नाही, या विचारात आहेत. 
कोरोना संसर्गाची भीती आहेच, शिवाय माथाडी कामगारांची कमतरताही आहे. शेतकरी वारंवार माल विकण्याची गळ घालत असल्याने त्यांच्यासाठी व्यापारी बाजारात येत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...