agriculture news in Marathi fruits and vegetable should be sanitize Maharashtra | Agrowon

फळे-भाजीपाला निर्जंतुक कराः सुनील केदार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

शेतकऱ्यांकडून भाजीपाला व फळे उत्पादित केल्यानंतर ग्राहकांपर्यंत पोचताना त्यांची अनेकांकडून हाताळणी होते.

नागपूर ः शेतकऱ्यांकडून भाजीपाला व फळे उत्पादित केल्यानंतर ग्राहकांपर्यंत पोचताना त्यांची अनेकांकडून हाताळणी होते. त्या पार्श्‍वभूमीवर बाजार समिती प्रशासनाने फळे व भाजीपाला निर्जंतुकीकरणाची कार्यवाही करावी, अशी सूचना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केली.

कळमना येथील जवाहरलाल नेहरु मार्केटयार्ड बाजार समितीला त्यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत बाजार समिती सचिव राजेश भुसारी होते. शहरासह राज्यात गेल्या १७ दिवसांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्‍यक सेवा सहज उपलब्ध होणे आवश्‍यक आहे, त्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. 

शेतमाल उत्पादक शेतकरी, अडते आणि किरकोळ भाजी विक्रेत्यांना मास्क लावण्यासह सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत त्यांनी सूचना केली. लॉकडाऊनच्या सुरुवातीला काही अडते व भाजी विक्रेत्यांनी कृषी उत्पादनाच्या खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र अत्यावश्‍यक सेवा देण्यात जाणीवपूर्वक अडथळा आणण्यात येत असल्याच्या कारणावरून परवाने रद्द केले जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर अडते व भाजी विक्रेत्यांनी व्यवहार सुरळीत ठेवल्याची माहिती राजेश भुसारी यांनी दिली. 

लॉकडाऊनच्या काळात भेंडी, गवार, कोथिंबीर, कोबी, भोपाळा यासह आंबा, डाळिंब, अननस, फणस अशी विविध फळे तसेच कृषिमाल मसालेजन्य पदार्थ मुबलक प्रमाणात येत असल्याने नागरिकांनी काळजी करु नये, असेही भुसारी यांनी सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...