अतिपावसाने मोसंबी बागांमध्ये फळगळ : डॉ. पाटील

पिंप्रीराजा, जि. औरंगाबाद: ‘‘सतत पडणाऱ्या पावसामुळे मोसंबी पिकाच्या मुळांची अन्नद्रव्य वहनाची क्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे फळांची उपासमार होऊन मोठ्या प्रमाणावर फळगळ होत आहे.’’
 Fruits in citrus orchards due to heavy rains: Dr. Patil
Fruits in citrus orchards due to heavy rains: Dr. Patil

पिंप्रीराजा, जि. औरंगाबाद : ‘‘सतत पडणाऱ्या पावसामुळे मोसंबी पिकाच्या मुळांची अन्नद्रव्य वहनाची क्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे फळांची उपासमार होऊन मोठ्या प्रमाणावर फळगळ होत आहे’’, असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.

पिंप्रीराजा, ता.औरंगाबाद येथे कृषी विभाग आयोजित (ता. २५) प्रक्षेत्र भेटी दरम्यान ते बोलत होते. या दरम्यान त्यांच्यासमवेत उपविभागीय कृषी अधिकारी अनिल हदगावकर, तंत्र अधिकारी सुभाष आघाव, कृषी पर्यवेक्षक सलीम चांद, मोसंबी बागायतदार तेजराव घोरपडे,  उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘मोसंबी पट्यात सतत होणाऱ्या पावसामुळे जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही. मुळांच्या परिसरात प्राणवायूची कमतरता जाणवत आहे. मुळांची दमकोंडी होऊन ते अन्नद्रव्याचे झाडाकडे वहन करू शकत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मोसंबी फळांची गळ होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.त्यासाठी निचरा होण्यासाठी बागेतील पाणी उतारास आडवे चर घेऊन बाहेर काढणे फायदेशीर ठरू शकते. सततच्या ओलाव्यामुळे फायटोपथोरा बुरशीची देखील वाढ होण्यास मदत होऊन फळगळ होऊ शकते.’’

नियंत्रणासाठी बुरशीनाशकाची आळवणी फायदेशीर ठरू शकते, असे तंत्र अधिकारी आघाव यांनी सांगितले. तेजराव घोरपडे यांनी आभार मानले. या भेटीवेळी बहुसंख्य मोसंबी बागायतदार उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com