औरंगाबाद जिल्ह्यात फळे, भाजीपाल्याची थेट विक्री २९ कोटींवर

कोरोनाच्या संकटात ग्राहकांना थेट फळे, भाजीपाला व धान्य घरपोच विक्री करण्याकामी मेहनत घेणारे शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांची उलाढाल २९ कोटी २५ लाख ३३ हजार ४३२ वर पोहचली आहे.
फळे, भाजीपाल्याची थेट विक्री २९ कोटींवर Fruits, vegetables directly Sales at Rs 29 crore
फळे, भाजीपाल्याची थेट विक्री २९ कोटींवर Fruits, vegetables directly Sales at Rs 29 crore

औरंगाबाद : कोरोनाच्या संकटात ग्राहकांना थेट फळे, भाजीपाला व धान्य घरपोच विक्री करण्याकामी मेहनत घेणारे शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांची उलाढाल २९ कोटी २५ लाख ३३ हजार ४३२ वर पोहचली आहे. शेतकऱ्यांना शेतीमालाच्या खरेदीदार ग्राहकांशी नाळ जोडून देण्याचे काम शेतकरी ते ग्राहक या थेट उपक्रमाने केले आहे.

गतवर्षी मार्चमध्ये कोरोना संकट सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याची अडचण येवू नये म्हणून शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल खासकरून फळे भाजीपाला विक्रीची संकल्पना पुढे आली. हे शक्‍य होईल की नाही, असे वाटत असताना आता वर्षभरापासून कमी अधिक प्रमाणात शेतकरी, शेतकरी गट व कंपन्यांनी यामध्ये सातत्यपूर्ण सहभाग देवून या संकल्पनेला जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. 

गतवर्षी २९ मार्चला सुरू झालेल्या या उपक्रमात सुरूवातील कमी असलेला प्रतिसाद वाढत गेला. शिवाय थेट विक्रीची सुरुवात औरंगाबाद शहरातून झाल्यानंतर तीचा विस्तार तालुका व छोट्या मोठ्या खेड्यापर्यंत जाऊन पोहचला. नुकताच जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात आढावा घेण्याची सूचना कृषी विभागाला केली होती. त्यानुसार शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्रीसाठी ८० शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तयारी दर्शविल्याचे पुढे आले. त्यासाठीचे नियोजन कृषी विभागाकडून सुरू आहे. कोरोना काळात नियमांचे पालन करून तयारी दर्शविणाऱ्यांकडून थेट शेतमाल ग्राहकांना विक्री करणे अपेक्षीत आहे.

शेतकरी, शेतकरी गटांकडून प्रतिसाद २९ मार्च २०२० ते ४ एप्रिल २०२१ पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास ७७ शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उपक्रमात सहभाग नोंदविला. या सर्वांनी जवळपास १ कोटी १० लाख ६७ हजार ५७८ किलो(११ हजार ६७ टन ५ क्‍विंटल ७८ किलो) भाजीपाल्याची तर ८९ लाख ६६ हजार १९३ किलो (८९६६ टन १९३ किलो) फळांची विक्री केल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

प्रतिक्रिया यंदा पहिल्यांदाच पावणेदोन एकरावर खरबूज लागवड केली. पारंपरिक पद्धतीने त्याची विक्री केली असती तर सव्वालाखाच्या पुढे पैसे झाले नसते. शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीच्या माध्यमातून उत्पादित १९ टन खरबूजचे २ लाख ८९ हजार झाले. सरासरी ३३ रुपयांचा दर मिळाला. - शरद पाटील रोडे, कौडगाव जि. औरंगाबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com