Agriculture news in Marathi Fuel price hikes upset agricultural arithmetic | Page 2 ||| Agrowon

इंधन दरवाढीमुळे शेतीचे गणित बिघडले

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

इंधन दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीचे महत्त्वाचे साधन असणारे, ट्रॅक्टरच्या मशागतीचे दर वाढले आहेत. शेतीचा वाढता खर्च आणि उत्पन्नाला मिळणारे बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती सध्या तोट्यात जात आहे.

गुमगाव, जि. नागपूर : पेट्रोल, डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातून शेतकरीसुद्धा सुटला नाही. इंधन दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीचे महत्त्वाचे साधन असणारे, ट्रॅक्टरच्या मशागतीचे दर वाढले आहेत. शेतीचा वाढता खर्च आणि उत्पन्नाला मिळणारे बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती सध्या तोट्यात जात आहे.

पूर्वी शेतकरी शेती मशागत बैलाच्या साह्याने करत असत. बैलाच्या मदतीने नांगरणी, वखरणी, पेरणी अशा प्रकारची सर्व कामे करताना शेतकऱ्याला कुठलाही खर्च येत नव्हता. कालांतराने आधुनिक काळात बैलांची जागा ही हळूहळू ट्रॅक्टरने घेतली. ‘घंटो का काम मिनिटो मे’ होत असल्याने शेती मशागतीला यांत्रिकीरणाची जोड मिळाली आहे. ट्रॅक्टरमुळे शेतीच्या कामांनाही वेग आल्याने शेतीकरिता ट्रॅक्टर महत्त्वाचे साधन झाले आहे. त्यामुळे शेतातील बहुतांश कामे ही सध्या ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे शेतीची मशागत आता परवडणारी नसली तरी काळानुरूप लाखांच्या घरात गेलेल्या बैलजोड्या ठेवणे सामान्य शेतकऱ्यांना परवडत नाही.

एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे शेतकरी आता चिंतेत सापडला आहे. सध्या शिवारात शेती मशागतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. परंतु शेतीची मशागतच करणे शेतकऱ्यांना महागात पडत असल्याने शेतकऱ्यांनी शेती करावी तरी कशी, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

बैलजोडीही महागली
पूर्वी शेतीची कामे ही बैलांच्या  मदतीने केली जात होती. आता ही  सर्व कामे ट्रॅक्टरच्या मदतीने होत आहेत. परंतु इंधनाचे दर हे दिवसेंदिवस गगनाला भिडत असल्याने अशी महागडी शेती करणे, शेतकऱ्यांना परवडणारी नाही. सध्या बैलजोडीचा भावही आवाक्याबाहेर गेल्याने शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.


इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...